Son murder his father who harassing his mother in pimpri 
पुणे

आईला त्रास देणाऱ्या वडिलांचा मुलानेच केला खून 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : आईला त्रास देत असल्याने मुलाने वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही घटना देहूगाव येथील विठ्ठलवाडी येथे घडली. 

संतोष विठ्ठल येळवंडे (वय 47, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. त्यांचा मुलगा विराज  (वय 20) याला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी आई कविता येळवंडे यांनी फिर्याद दिली आहे.

पुणे रेल्वे स्टेशनवरून कोणत्या गाड्या केल्या रद्द? का?

रविवारी (ता. 16) रात्री साडे दहाच्या सुमारास संतोष हे दारू पिऊन पत्नी कविता यांना मारहाण करीत होते. आईला मारहाण करीत असल्याने मुलगा विराज याने वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये संतोष गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

प्रवाशांची अडवणूक न करता खेड-शिवापूर टोल नाक्यावर झाले आंदोलन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Economic Crisis: पाकिस्तान व फिलिपिन्समध्ये चार दिवसांचा आठवडा; दरवाढीमुळे आपत्कालीन उपाययोजना, इंधन वाचविण्याचा प्रयत्न!

Sarpanch Bribe Case : गरीब ग्रामस्थाची झोपडी दुरुस्त करण्यासाठी सरपंचाने 15 हजारांची मागितली लाच, 'असा' अडकला जाळ्यात!

Kalamb Municipal Council Tightens Rules Against Garbage Dumping: कळंबमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर; नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाईचा इशारा

Iran Missile Attack: सततच्या हल्ल्यांमुळे तणाव कायम; इराणकडून आखाती देशांवर क्षेपणास्त्र हल्ले, शस्त्रसंधी नाहीच!

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगरमध्ये अंत्यविधीसाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला, ८ ते १० जण जखमी

SCROLL FOR NEXT