Beer_Bar
Beer_Bar 
पुणे

२३ बियर बार चालकांवर राज्य उत्पादन शुल्काची कारवाई; 'सोशल डिस्टन्सिंग'चे नियम बसवले धाब्यावर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 23 बियर बार आणि वाईन शॉप चालकांनी सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. या बारचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी संबंधित बार आणि वाईन शॉपचालकांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे. 

जिल्ह्यात हॉटेल, बियर बार, फुड मॉल आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास पाच ऑक्‍टोबरपासून परवानगी देण्यात आली. ही परवानगी देताना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने सात ऑक्‍टोबर रोजी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यात बिअर बारमध्ये 50 टक्‍के ग्राहकांची मर्यादा, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, स्वच्छता आणि तापमान तपासण्यासाठी थर्मल गन या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत बार आणि वाईन शॉपच्या मालकांकडून सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. शहर आणि ग्रामीण भागातील अशा 21 बियर बार, एक देशी दारू आणि एका वाईन शॉपच्या मालकावर ही कारवाई करण्यात आली आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हॉटेल, बारचालकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास दहा हजार रुपये, दुसऱ्यांदा 25 हजार आणि तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास 50 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. यानंतर नियम मोडल्यास परवाना रद्द करण्यात येणार आहे. 
- संतोष झगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे जिल्हा 

- पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT