Stray Dog Sakal
पुणे

पुण्यात भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीला येणार वेग

लॉकडाऊन आणि तांत्रिक अडचणींमुळे गेल्या दीड वर्षापासून शहरातील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याची मोहीम थंडावली होती.

सकाळ वृत्तसेवा

लॉकडाऊन आणि तांत्रिक अडचणींमुळे गेल्या दीड वर्षापासून शहरातील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याची मोहीम थंडावली होती.

पुणे - लॉकडाऊन (Lockdown) आणि तांत्रिक अडचणींमुळे (Technical Problem) गेल्या दीड वर्षापासून शहरातील भटक्या कुत्र्यांची (Stray Dog) नसबंदी करण्याची मोहीम (Sterilization Campaign) थंडावली होती. मात्र, आता नसबंदीच्या मोहिमेला पुन्हा एकदा जोर येणार आहे. स्थायी समितीने (Standing Committee) आज (ता.१६) भटक्या आणि मोकाट कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी पाच संस्थांची तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.

पुणे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. रात्रीच्या वेळी ही भटके कुत्रे दुचाकीस्वारांच्या पाठीमागे लागत असल्याने अनेकांचे अपघात झाले आहेत. तसेच कुत्र्यांनी चावा घेतल्याचेही प्रकार घडत आहेत. वस्ती, सोसायट्यांच्या परिसरातील या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांकडून अनेकदा महापालिकेकडे मागणी केली जाते. पण सुमारे गेल्या दीड वर्षापासून शहरात दोन संस्था काम करत होत्या, कालांतराने तांत्रिक अडचणींमुळे एका संस्थेचे काम थांबविण्यात आले होते. सद्यःस्थितीत एकाच संस्थेकडून काम केले जात आहे.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात सध्या सुमारे २ लाख ५० हजार भटकी कुत्री आहेत, त्यापैकी गेल्या वर्षभरात सुमारे १५ हजार कुत्र्यांची नसबंदी झाली आहे. महापालिकेने कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी एकाच संस्थेला काम न देता शहराच्या पाच विभागात पाच संस्था नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होत. त्यानुसार प्रस्ताव मागविण्यात आले होते. या संस्थांना शस्त्रक्रिया करण्यासाठी सुविधा उभारणे, वाहनांची व्यवस्था करणे, औषधोपचार, अँटी रेबीज लसीकरण याचा खर्च करावा लागणार आहे.

ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या मान्यतेनुसार महापालिकेने संस्थांसाठी दर निश्चित केले आहेत. यामध्ये एका कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी १४०० रुपये देण्यात येणार आहेत. तर ज्या ठिकाणावरून कुत्र्याला पकडले त्याला परत त्याच ठिकाणी सोडण्यासाठी २०० रुपये दिले जाणार आहेत. १ हजार ६०० रुपयांचा एका कुत्र्यासाठी खर्च येणार आहे, असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी ही माहिती दिली.

या संस्थांची नियुक्ती

द पीपल फॉर एनव्हायरमेंट अँड ॲनिमल, ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन, जीवरक्षा, जेनी स्मिथ ॲनिमल वेल्फेअर ट्रस्ट आणि युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी या पाच संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. पशू संवर्धन विभागाचे प्रमाणपत्र घेणे, महापालिकेने प्रमाणित केलेले ॲप वापरणे, वाहनांना जीपीएस सिस्टिम लावणे बंधनकारक केले आहे, असे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता शाळांमध्ये लाठी-कराटेचे प्रशिक्षण मिळणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; नवी योजना कधीपासून सुरू होणार?

Rohit Sharma Wife Viral Video : रोहित शर्मावर भडकली पत्नी रितिका! T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर असं काय झालं, की कॅमेऱ्यासमोरच सुरू झाला वाद? पहा भांडणाचा व्हिडिओ

List of T20 World Cup 2026 awards: पाकड्याला नमवून संजू सॅमसनने जिंकले दोन पुरस्कार, तर जसप्रीत बुमराहने पटकावले तीन...

Latest Marathi News Live Update : कल्याणच्या द्वारली पाड्यात गुरचरण जमिनीवर अतिक्रमण, म्हैस घेऊन केडीएमसी आय प्रभाग कार्यालयात नागरिकांचे आंदोलन

Horoscope : उद्या १० मार्चला दशांक योग! मेषसह 'या' ५ राशींच्या लोकांचे नशीब पलटणार; धनलाभ नक्की, अचानक होणार १० फायदे

SCROLL FOR NEXT