अन् पुर्ववत झाला श्वास

राजाराम पूल ते म्हात्रे पूल जोडणाऱ्या राजा मंत्री (डीपी) रस्त्यावरील आलोहा क्लिनिकमधील चित्तथरारक ही घटना.
ECG
ECGSakal
Published on
Summary

राजाराम पूल ते म्हात्रे पूल जोडणाऱ्या राजा मंत्री (डीपी) रस्त्यावरील आलोहा क्लिनिकमधील चित्तथरारक ही घटना.

पुणे - वयाची सत्तरी ओलांडलेले रुग्ण (Patient) त्यांच्या पत्नीबरोबर क्लिनिकला (Clinic) आले. पत्नी डॉक्टरांना (Doctor) म्हणाल्या, ‘त्यांनी आज नेहमीपेक्षा जास्त व्यायाम (Exercise) केलाय. त्यामुळे त्यांना चक्कर आल्यासारखं वाटतंय.’ डॉक्टरांनी ‘ईसीजी’ (ECG) काढायला सांगितला. त्यातून रुग्णाच्या हृदयाची गती वाढल्याचे निदान झाले. तातडीने त्याला शॉक ट्रीटमेंट (Shock Treatment) करण्यात आली. पण, दुसऱ्या ‘ईसीजी’ची ‘लाईन स्ट्रेट’. हृदयाची क्रिया थांबली. त्यानंतर एकेक श्वास वाचविण्याची डॉक्टरांची धडपड सुरू झाली. शॉकची तीव्रता वाढवली, त्यानंतर तिसऱ्या ‘ईसीजी’वर पुन्हा लाइन दिसू लागल्या...

राजाराम पूल ते म्हात्रे पूल जोडणाऱ्या राजा मंत्री (डीपी) रस्त्यावरील आलोहा क्लिनिकमधील चित्तथरारक ही घटना. पतीला अस्वस्थ वाटू लागल्याची तक्रार घेऊन पत्नी क्लिनिकमध्ये आल्या. रुग्णाला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. कर्करोगातून ते बरे झाले होते. त्यामुळे पतीला अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी थेट क्लिनिक गाठले. अत्यंत कमी वेळेत अचूक निदान आणि वेगाने केलेले उपचार यामुळे रुग्णाचे प्राण वाचले.

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे म्हणाले, ‘पहिला ‘ईसीजी’ काढला त्याच वेळी परिस्थिती गंभीर असल्याचे क्षणार्धात लक्षात आले. रुग्णाला तातडीने शॉक देऊन हृदयाची क्रिया पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. दोन वेळा शॉक दिल्यानंतर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिसरा शॉक दिला. त्यानंतर रुग्ण प्रतिसाद देऊ लागला. त्यानंतर ‘कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन’ (सीपीआर) देण्यात आले. त्यातून रुग्णाला स्थिर करून पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. पाच दिवसांनंतर रुग्ण चालत बाहेर पडला.’

ECG
गुंड गजा मारणेची पत्नी राष्ट्रवादीत; भाजपचे १५ नगरसेवकही वाटेवर?

असे प्रकार उद्भवल्यास प्राथमिक बाबी करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारी कार्यालये, पोलिस, खासगी कंपन्या, शिक्षण संस्थांमधून ‘सीपीआर’चे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू करण्याची आवश्यकता असल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

‘अशा घटना समाजात कोठेही घडू शकते. त्यासाठी अचानक कोसळलेल्या रुग्णाला ‘सीपीआर’ देण्याचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाने घेतले पाहिजे. ही आधुनिक काळाची गरज आहे. तसेच, हृदयविकाराच्या रुग्णांसाठी शॉक देण्याची व्यवस्था क्लिनिकमध्ये असली पाहिजे. त्यातून आपत्कालीन वैद्यकीय स्थितीत रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य होते.’

- डॉ. अश्विनी जोशी

‘सीआरपी’चे महत्त्व

- हृदयाचे कार्य पुन्हा सुरू करण्यासाठी उपयुक्त

- अचानक कोसळणाऱ्या रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य

- ‘सीआरपी’चे शास्त्रीय प्रशिक्षण गरजेचे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com