पुणे

Trupti Kolte : सरकारी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही; तृप्ती कोलते

कृष्णकांत कोबल

मांजरी : राज्यसरकारने दिवंगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे कामकाज सुरू होईल तेंव्हा होईल. मात्र, हवेली तालुक्यातील कोणताही दिव्यांग बांधव सध्यातरी सरकारी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल. असे आश्वासन तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी दिले. येथील जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त स्नेहमेळाव्यासह दिव्यांगांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी तहसीलदार तृप्ती कोलते पाटील बोलत होत्या. ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय ननावरे यांनी प्रास्ताविक केले.

आमदार चेतन तुपे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले, माजी उपसरपंच अमित घुले, महाराष्ट्र राज्य बलुतेदार संस्था फेडरेशनचे अध्यक्ष शिवाजी आदमाने, कात्रज दूध संघाचे संचालक गोपाळ म्हस्के, बाबासाहेब शिंगोटे, प्रा. सुवर्ण गोरे, निलेश घुले, बाबा मोरे, शैलेंद्र बेल्हेकर, शेखर पेटकर, डॉ. अनिस खान, बाळासाहेब भोसले, लक्ष्मण भोसले, पालिकेच्या समाज विकास विभागाच्या पूनम गायकवाड, संगीता घुले, नानासाहेब भापकर, बाळासाहेब एडके, तलाठी योगीराज कनिचे, शशिकांत माने, विकास वाबळे आदी यावेळी उपस्थित होते.

दिव्यांग बांधवांनी यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गावातून प्रभात फेरी काढली होती. दिव्यांगांची मोफत आरोग्य तपासणी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिव्यांगांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. लायन्स क्लबच्या वतीने डॉ. अनिस खान यांनी दिव्यांगांना तणावमुक्त जीवनासाठी हास्ययोगाचे धडे दिले.

आमदार तुपे पाटील म्हणाले, "दिव्यांगांना सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांच्यासाठीच्या विविध योजना सक्षमपणे राबविल्या गेल्या पाहिजेत. जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टकडून यासाठी विश्वासार्ह प्रयत्न केले जात आहेत. दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी आपणही सरकारकडे पाठपुरावा घेऊ.'

ट्रस्टचे सदस्य आबासाहेब भैरवकर, ओंकार अंकुशे, पृथ्वीराज म्हस्के, अभय पाटील, अमोल हंकारे, अतुल घुले, शशिकांत राऊत, संतोष तोरणे, राघव बारवकर, गणेश नन्नवरे आदींनी संयोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT