Tukaram Supe sakal
पुणे

TET Paper Case; अश्‍विनकुमार शिवकुमार याने तुकाराम सुपेंना दिले ३० लाख रुपये

आयुक्त तुकाराम सुपे यांना २०१८ साली टीईटीची परीक्षा घेणाऱ्या जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा.लि. कंपनीचा संचालक अश्विनकुमार शिवकुमार याने ३० लाख रुपये देण्याचे पोलिस तपासातून झाले उघड.

सकाळ वृत्तसेवा

आयुक्त तुकाराम सुपे यांना २०१८ साली टीईटीची परीक्षा घेणाऱ्या जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा.लि. कंपनीचा संचालक अश्विनकुमार शिवकुमार याने ३० लाख रुपये देण्याचे पोलिस तपासातून झाले उघड.

पुणे - शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार (TET Non-Behavior) प्रकरणात महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना २०१८ साली टीईटीची परीक्षा घेणाऱ्या जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीचा संचालक अश्विनकुमार शिवकुमार (Ashwinkumar Shivkumar) याने ३० लाख रुपये (Money) देण्याचे पोलिस तपासातून (Police Inquiry) उघड झाले आहे. शिवकुमार याने जबाबात ही माहिती पोलिसांना दिली.

या गुन्ह्याच्या तपासासाठी सुपे (वय ५८, रा. पिंपळे गुरव) आणि परीक्षा घेणाऱ्या जी.ए.टेक्नॉलॉजी प्रा.लि. कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख याचे एजंट संतोष लक्ष्मण हरकळ (वय ४२, रा. औरंगाबाद) व अंकुश रामभाऊ हरकळ (वय ४४, रा. बुलढाणा) यांना अटक करण्यात आली आहे. २०१८ साली झालेल्या टीर्इटी परिक्षेच्या निकालाबाबत राज्य परिक्षा परिषदेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच जळगाव येथील शिक्षणाधिकारी यांच्याकडून ८१ बनावट प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर त्यानंतर जबाबदार पदावर काम करीत असताना सुपे यांनी कोणतीही ठोस कारवार्इ केला नाही. संतोष हरकळ याच्या विद्यार्थ्यांच्या यादीमधील १८ परीक्षार्थींना गुणपत्रक न मिळाल्याने शिवकुमार याने त्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांची रंगीत प्रिंट काढून मुंबर्इतील एका एजंटला नेवून दिली, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.

बनावट प्रमाणपत्र आल्यानंतर सुपे यांनी संबंधितांवर कारवार्इ का केली नाही? प्रमाणपत्र मिळालेले १८ विद्यार्थी कोण आहेत? तसेच तपासादरम्यान पुढे आलेल्या विविध बाबींचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याचा युक्तिवाद सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केला. न्यायालयाने आरोपींना १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

देशमुख याने संतोष आणि अंकुश हरकळ यांच्यामाध्यमातून बुलढाणा, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, पुणे, मुंबई येथील वेगवेगळे एजंट, क्लासचालक यांच्याशी संपर्क साधत पेपरफुटी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच सुपे यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या शासकीय वाहनावरील चालक सुनील घोलप याने त्यांच्याकडे आलेल्या परीक्षार्थींची नावे व हॉलतिकीटची माहिती त्याच्या मोबाईल व्हाटसअपवरुन देशमुखच्या व्हॉटसअपवर पाठविल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. देशमुख याने गैरव्यवहारातून प्राप्त केलेल्या रकमेतून वर्धा येथे शेतजमीन तसेच चारचाकी वाहन खरेदी केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात यापूर्वी अभिषेक सावरीकर, डॉ. प्रीतिश देशमुख, अश्विनीकुमार शिवकुमार यांच्यासह इतर शासकीय नोकरदार तसेच एजंट आणि साखळीतील इतरांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अजय वाघमारे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs NZ: पाकड्यांशी भिडायला किवींनी संघात १, २ नव्हे तर ३ बदल केले, पण पावसाने सगळे गणितच बिघडवले! आता पुढचे समीकरण काय?

Pune Traffic : सायलेन्सर व ड्रिंक ॲण्ड ड्राईव्हविरोधात वाहतूक शाखेची कारवाई; ३४८ बुलेटस्वरांकडून तीन लाख ३४ हजार रुपयांचा दंड वसूल

Trump Tariff: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डोनाल्ड ट्रम्प भारताकडून किती टॅरिफ आकारणार? हा कर फक्त १५० दिवसांसाठी का लादला?

२०२४ ला डेटिंगची चर्चा, २०२५ मध्ये नातं जगजाहीर; आता शिखर धवनने आयरिश प्रेयसीसोबत लग्न केलं, सोफी शाइन आहे तरी कोण? पाहा फोटो

रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; तासन् तास उशिरा धावतात पॅसेंजर गाड्या; प्रवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण

SCROLL FOR NEXT