पुणे जिल्ह्यातील ५७५ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील मुलींच्या जन्माचे प्रमाण तुलनेने खूप कमी झाले

पुणे जिल्ह्यात एक हजार मुलांच्या मागे सरासरी ९४१ मुली आहेत. हेच प्रमाण २०११ च्या जनगणनेनुसार दर हजारी मुलांमागे ८८३ मुली इतके होते.
Born Baby Girl
Born Baby GirlSakal
Updated on
Summary

पुणे जिल्ह्यात एक हजार मुलांच्या मागे सरासरी ९४१ मुली आहेत. हेच प्रमाण २०११ च्या जनगणनेनुसार दर हजारी मुलांमागे ८८३ मुली इतके होते.

पुणे - पुणे जिल्ह्यातील (Pune District) एकूण ग्रामपंचायतींपैकी (Grampanchyat) ५७५ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील मुलींच्या जन्माचे (Girl Birth Rate) प्रमाण तुलनेने खूप कमी झाले आहे. या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील दर हजारी मुलांमागील मुलींचे प्रमाण हे ९१२ पेक्षाही कमी आहे. या सर्व ग्रामपंचायती या मुलींच्या जन्म प्रमाणाच्या बाबतीत रेड झोनमध्ये (Red Zone) गेल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण तालुक्यांपैकी प्रगत समजले जाणारे हवेली आणि दौंड हे दोन तालुके मुलींच्या प्रमाणात डेंजर झोनमध्ये गेले आहेत. याउलट अतिदुर्गम आणि डोंगरी तालुके म्हणून ओळखले जाणारे भोर व वेल्हे या दोन तालुक्यांतील मुलींचे प्रमाण एक हजारांहून अधिक आहे. त्यामुळे दोन्ही तालुके मुलींच्या जन्माच्या प्रमाणात जिल्ह्यात अव्वल ठरले आहेत.

सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात एक हजार मुलांच्या मागे सरासरी ९४१ मुली आहेत. हेच प्रमाण २०११ च्या जनगणनेनुसार दर हजारी मुलांमागे ८८३ मुली इतके होते. त्यामुळे गेल्या दहा वर्षात जिल्ह्यातील मुलींच्या प्रमाणात सरासरी ५८ ने वाढ झाली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला, बालकल्याण आणि आरोग्य विभागाच्यावतीने पुणे जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर निश्‍चित करण्यासाठी नुकतेच शून्य ते सहा वर्षे या वयोगटातील मुला-मुलींचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून हे प्रमाण निश्‍चित झाले आहे.

Born Baby Girl
वाघोलीत नऊ वर्षीय मुलीचा भैरवनाथ तलावात पडून मृत्यू

या सर्वेक्षणासाठी गाव आणि तालुकानिहाय मुला-मुलींची यादी तयार करण्यात आली. या यादीनुसार दर हजारी मुलांमागे असलेले मुलींच्या जन्माचे प्रमाण निश्‍चित कऱण्यात आले आहे. समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातील पहिल्या फेरीत ३ लाख २८ हजार मुला-मुलींची यादी तयार करण्यात आली. यापैकी ३ लाख ११ हजार मुला-मुलींची तपासणी करण्यात आली आहे.

या सर्वेक्षणात मुला-मुलींच्या प्रमाणानुसार गावे आणि तालुक्यांचे स्वतंत्रपणे तीन झोनमध्ये वर्गीकरण करण्यात आले. या वर्गीकरणात मुलींचे प्रमाण चांगले असलेले गावे आणि तालुक्यांची गणना ग्रीन झोन, समाधानकारक प्रमाण असलेले गावे आणि तालुक्यांची गणना ऑरेंज तर, खुपच कमी संख्या असलेल्या गावांची गणना रेड झोनमध्ये करण्यात आली आहे.

ग्रीन झोनमध्ये नोंद झालेली गावे आणि तालुक्यांमधील मुलींचे प्रमाण दर हजारी मुलांच्या प्रमाणात किमान ९४९ किंवा त्याहून अधिक आहे. ऑरेंज झोनमधील गावांमध्ये हेच प्रमाण किमान ९१२ ते कमाल ९४८ इतके असून, रेड झोनमध्ये नोंदणी केलेल्या क्षेत्रात (गावे किंवा तालुके) हे प्रमाण ९१२ पेक्षा खाली असल्याचे या पाहणीत दिसून आले आहे.

झोननिहाय तालुक्यांची नावे

ग्रीन झोनमधील तालुके - भोर, वेल्हे, मुळशी, बारामती, इंदापूर, जुन्नर.

ऑरेंज झोन तालुके - शिरूर आंबेगाव, खेड व मावळ.

रेड झोनमधील तालुके - हवेली, दौंड

झोननिहाय ग्रामपंचायतींची संख्या

ग्रीन झोन - ६८६

आरेंज झोन - १११

रेड झोन - ५७५

एकूण ग्रामपंचायती - १ हजार ३७२

Born Baby Girl
पुणे शहरातील हवेची गुणवत्ता गेल्या महिन्याभरात समाधानकारक श्रेणीच्या खाली नोंदली गेली

जिल्ह्यातील दर हजारी मुलांमागील मुलींची तालुकानिहाय संख्या

वेल्हे --- १०७७

भोर --- १०४८

जुन्नर --- ९८५

इंदापूर --- ९६४

मुळशी --- ९५५

बारामती --- ९५१

खेड --- ९४७

आंबेगाव --- ९३८

पुरंदर --- ९२४

मावळ --- ९२३

शिरूर --- ९१६

दौंड --- ९०८

हवेली --- ९०६

पुणे जिल्हा सरासरी प्रमाण --- ९४१

पुणे जिल्ह्यातील दर हजारी मुलांमागील मुलींच्या प्रमाणात २०११ च्या जणगणनेतील आकडेवारीच्या तुलनेत समाधानकारक वाढ झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे विविध विविध उपक्रम व कायदे प्रभावीपणे राबविण्यात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यशस्वी ठरले आहे. त्यातूनच हे हे प्रमाण वाढण्यात यश आले आहे. बाल लिंग गुणोत्तर आणखी सुधारण्यासाठी व स्त्री भ्रूण हत्या किंवा बालिका हत्येची कोणतीही प्रथा नाहीशी करण्यासाठी, जिल्हा परिषद प्रशासन आशा स्वयंसेविकांच्या मदतीने माता आणि कुटुंबांचे समुपदेशन करत आहोत.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com