Pune ZP Sakal
पुणे

सर्वात श्रीमंत पुणे झेडपीची ओळख पुसली जाणार

आतापर्यंत राज्यात सर्वाधिक उत्पन्न असलेली आणि सर्वाधिक मुद्रांक शुल्क निधी मिळवणारी पुणे ही एकमेव जिल्हा परिषद होती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्हा परिषदेच्या (Pune ZP) कार्यक्षेत्रातील मोठी व मालदार गावे महापालिकेत (Municipal) समाविष्ट झाल्याने, यापुढे पुणे जिल्हा परिषदेच्या वार्षिक उत्पन्नात (Income) दरवर्षी सुमारे १०० कोटींचा खड्डा पडणार आहे. याचा फटका जिल्हा परिषदेच्या दरवर्षीच्या अर्थसंकल्पाला (Budget) बसणार आहे. यामुळे अर्थसंकल्पाची रक्कम सध्याच्या रकमेपेक्षा सुमारे २५ टक्क्यांनी कमी होणार आहे. परिणामी राज्यातील सर्वात श्रीमंत जिल्हा परिषद म्हणून निर्माण झालेली पुणे जिल्हा परिषदेची ओळख आता पुसली जाणार आहे. जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (The Identity Richest Pune ZP will be Erased)

आतापर्यंत राज्यात सर्वाधिक उत्पन्न असलेली आणि सर्वाधिक मुद्रांक शुल्क निधी मिळवणारी पुणे ही एकमेव जिल्हा परिषद होती. यामुळे राज्यातील सर्वाधिक श्रीमंत अशी स्वतःची नवी ओळखही या जिल्हा परिषदेने निर्माण केली होती. यामुळे राज्यातील सर्वाधिक मोठ्या रकमेचा अर्थसंकल्प हा पुणे जिल्हा परिषदेचा असायचा. आता ही रक्कम दरवर्षी सुमारे १०० कोटींनी कमी होणार आहे.

मुद्रांक शुल्क हा जिल्हा परिषदांच्या वार्षिक उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत. कारण मालमत्तांच्या खरेदी-विक्रीतून जमा होणाऱ्या एकूण मुद्रांक शुल्कापैकी एक टक्का शुल्क हे मुद्रांक शुल्क अनुदानापोटी जिल्हा परिषदांना मिळत असते. यानुसार पुणे जिल्हा परिषदेला दरवर्षी अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळत असे.

या मुद्रांक शुल्क अनुदानात सर्वाधिक हिस्सा या २३ गावांमधील होता. कारण मालमत्ता खरेदी-विक्रीचे सर्वाधिक व्यवहार हे पुणे शहरालगतच्या गावांमध्ये होत असत. त्यामुळे साहजिकच जिल्हा परिषदेच्या एकूण वार्षिक उत्पन्नात या गावांचा मोठा हिस्सा होता. तो हिस्सा आता यापुढे जिल्हा परिषदेला मिळणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwajeet Kadam Helicopter : कार्यकर्ता जपावा तर असा! वेळेअभावी आमदार विश्वजीत कदम थेट हेलिकॉप्टरने वास्तुशांतीला; गावात हेलिकॉप्टर येताच जल्लोष

Solapur Farmers: लिंकिंगच्या सक्तीमुळे आर्थिक लूट! युरियाचे २६६ रुपयांचे पोते ३५० ला; शेतकऱ्यांतून संताप व्यक्त

कोरोना लसीमुळे कॅन्सर अन् हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय? नाना पटोलेंच्या दाव्यात किती तथ्य; खरं काय जाणून घ्या

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT