Crime News sakal
पुणे

Pune Crime : महिला दिनाच्या दिवशीच सासूने सुनेचं फरशीवर डोकं आपटून केला खून, कारण...

महिला दिनाच्या दिवशी एका महिलेनेच महिलेचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना

सकाळ डिजिटल टीम

महिला दिनाच्या दिवशी एका महिलेनेच महिलेचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरकाम नीट करत नाही म्हणून सासूने सुनेचे डोके फरशीवर आपटून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील लोहगाव परिसरामध्ये ही घडली घटना आहे.

घरातील काम नीट करत नाही, तसेच नातवाचा व्यवस्थित सांभाळ करत नसल्यामुळे सासूने सुनेचा फरशीवर डोके आपटून खून केला आहे. या घटनेप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितू रवींद्र माळवी (वय २८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर या प्रकरणी तिची सासू कमला प्रभुलाल माळवी (वय49) हिला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सून घरात व्यवस्थित काम करत नाही, नातवाचा सांभाळ करत नाही या कारणावरून दोघींमध्ये वाद होते. दोन दिवसांपूर्वी सासू घरातील फ्रिजचा दरवाजा उघडत होती, यावेळी तिचा पाय चुकून सुनेला लागला. या कारणावरून दोघींमध्ये वादावादी झाली. त्यानंतर कमलाने रितूला मारहाण केली तसेच तिचे डोके फरशीवर आपटले. या घटनेत रितुच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat Canada Visit : भारत 'महाशक्ती' की ‘विश्वगुरू’ ? कॅनडातील भाषणात मोहन भागवतांनी सांगितला भारतीय विचार

Kolhapur Wildlife News : गगनबावड्यात आढळला साडेपाच फूट लांबीचा अजगर; ग्रामस्थांची उडाली भंबेरी, वन विभागाच्या प्रसंगावधानाने टळला मोठा धोका

Pune Crime: कौटुंबिक वादातून मुलाकडून आईला बेदम मारहाण; उपचारांपूर्वीच मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना यवत पोलिसांची नोटीस; आक्रोश मोर्चाबाबत महत्त्वाच्या सूचना

Nepal Flood: नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलयाचा धोका! भोटेकोसी नदी फुगली; ७८८ मृत्यू, तीन हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता

SCROLL FOR NEXT