Crime Sakal
पुणे

दोन डिलिव्हरी बॉईजसह तिघांना अटक

फूड डिलिव्हरी देण्यासाठी गेल्यानंतर ज्येष्ठ महिलांवर पाळत ठेवून त्यांच्याकडील दागिने हिसकावणा-या झोमॅटो, स्वीगीतील दोन डिलिव्हरी बॉईजसह तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - फूड डिलिव्हरी (Food Delivery) देण्यासाठी गेल्यानंतर सोसायटीच्या आवारात ज्येष्ठ महिलांवर (Old Women) पाळत ठेवून त्यांच्याकडील दागिने (Jewellery) हिसकावणा-या झोमॅटो, (Zomato) स्वीगीतील (Swiggy) दोन डिलिव्हरी बॉईजसह (Delivery Boys) तिघांना हडपसर पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. त्यांनी हडपसर आणि चंदननगर भागात ज्येष्ठ महिलांचे दागिने चोरल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. (Three Arrested with Zomato Swiggy Delivery Boy)

या प्रकरणी आकाश सिद्धलिंग जाधव (वय २३ सध्या रा. शिंदे वस्ती, हडपसर, मूळ रा. सेटलमेंट वसाहत, सोलापूर), विजय जगन्नाथ पोसा (वय २२, रा. तुळजाभवानीनगर, खराडी) आणि साहिल अनिल गायकवाड (वय १९, रा. सावरखेड, जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आले आहे. आकाश हा झोमॅटो तर विजय हा स्वीगी कंपनीत गेल्या वर्षभरापासून डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहेत. गायकवाड एका व्यायामशाळेत सफाईचे काम करतो, अशी माहिती परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली.

हडपसर भागातील निर्मल टाऊनशिप सोसायटीच्या आवारातून निघालेल्या एका ज्येष्ठ महिलेचे दागिने 16 जून रोजी चोरट्यांनी हिसकावून नेले होते. त्यानंतर पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. चित्रीकरणात पसार झालेल्या चोरट्याकडे अ‍ॅपआधारित घरपोच खाद्यापदार्थ सेवा देणाºया कंपनीची पिशवी असल्याचे निदर्शनास आले होते. 

त्यानंतर पोलिसांनी हडपसर भागातील  दुकाने तसेच वेगवेगळ्या भागातील सीसीटीव्ही कॅमेºयांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेऊन चोरट्यांचा माग काढण्यास सुरूवात केली. तेव्हा चोरटे चंदननगर, खराडीपर्यंत गेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी जाधव, पोसा, गायकवाड यांचा माग काढून त्यांना ताब्यात घेतले. चोरट्यांकडून १ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू अडागळे, दिगंबर शिंदे, सहायक निरीक्षक हनुमंत गायकवाड, उपनिरीक्षक सौरभ माने यांनी ही कारवाई केली.

चंदननगर चार ग्रॅमचे मंगळसुत्र हिसकावले :

हडपसरमधील घटनेनंतर 19 तारखेला देखील चंदननगर भागातील एका सोसायटीमधील ज्येष्ठ महिलेचे अंदाजे चार ग्रॅमचे मंगळसुत्र अशाच प्रकारे हिसकावून चोरीला गेले होते.

दोन्ही घटनेतील आरोपी एकच असावेत असा अंदाज होता. चोर शोधण्यासाठी चारशेहून अधिक सीसीटीव्हीचे  फुटेज तपासून तिघांच्या अटक करण्यात आली. या दोन्ही घटनेतील 22 ग्रॅम सोन्याचे दागिने आरोपींकडून जप्त करण्यात आले आहे.

- नम्रता पाटील, उपायुक्त,परिमंडळ पाच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT