पुणे जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

civil-court-pune

पुणे जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये

पुणे : कोरोना निर्बंधातून सूट देण्याबाबत ठरविण्यात आलेल्या स्तरांत बदल झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एकाच शिफ्टमध्ये सुरू राहणार आहे. एका आठवड्यातच कामकाजाची वेळ पुन्हा कमी केल्याने वकील आणि पक्षकारांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

बुधवारपासून (ता. १३) न्यायालयीन कामकाज सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत सुरू राहणार आहे. या काळात न्यायाधीश पूर्ण क्षमतेने तर ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थित कामकाज चालेल, असे प्रमुख जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे यांनी जाहीर केलेल्या परिपत्रकात नमूद आहे.

हेही वाचा: मुंबईकर, पुणेकरांनी लसीकरणात मारली बाजी!

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने १५ जूनपासून न्यायालये पूर्ण क्षमेतेने दिवसभरासाठी खुली करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार मंगळवारपर्यंत (ता. २२) त्याचे कामकाज चालले. न्यायालयाची वेळ कमी केल्याने नियमितची सुनावणी सुरू असलेल्या दाव्यांना पुढील तारखा मिळण्याची शक्यता आहे. तर महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुन्हा दावे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढणार आहे, अशी भीती पक्षकार आणि वकिलांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी साकारणार 'city library'

''कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दररोज बदल होत आहे. मात्र, वकील आणि पक्षकार कोरोना विषयक काळजी घेत आहेत. कामकाज बंद असल्याने दावे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच अनेक वकिलांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे न्यायालय एका सत्रात सुरू ठेवणे योग्य नाही, असे म्हणणे प्रमुख जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे यांच्याकडे पुणे बार असोसिएशनने मांडले आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार न्यायालय एकवेळ सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.''

- अॅड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

Web Title: The Work Of Pune District Court Started In A Single

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top