पुणे

Coronavirus: पुण्यात आजपासून तीन दिवस व्यापार बंद 

सकाळवृत्तसेवा

किराणा, दूध, भाजीपाला, औषधी दुकानांना वगळले 
पुणे - शहरातील कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर उद्यापासून (मंगळवार) तीन दिवस व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला आहे. महासंघाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गुरुवारपर्यंत (ता. 19) शहरातील घाऊक आणि किरकोळ व्यापार बंद राहणार आहे. मात्र, या बंदमधून जीवनावश्‍यक वस्तू किराणा, दूध, भाजीपाला, औषधी दुकाने आदींना वगळण्यात आले आहे. 

तीन दिवसांनंतर शहरातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय येत्या गुरुवारच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. बैठकीस सराफ, होजिअरी, कापड, ऑटोमोबाईल, प्लायवूड, स्टील, नॉन फेरस मेटल, पेपर, प्लॅस्टिक, इलेक्‍ट्रिक अँड इलेक्‍ट्रॉनिक, मशिनरी व वेल्डिंग, कॉम्प्युटर, टॉईज, वॉच, सायकल, केमिकल आदी व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, वरिष्ठ उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, उपाध्यक्ष रतन किराड, सचिव महेंद्र पितळीया, सहसचिव हेमंत शहा, सहसचिव जयंत शेटे, खजिनदार मनोज सारडा, मोहन पटेल, दीपक शहा, शांतिलाल ओसवाल, नितीन काकडे, बॉबी माईनी, रवी जसनानी, सुरेश जेठवानी, प्रसाद देशपांडे, उमेश झंवर, मंगेश भालेराव, बक्षीसिंग तलवार, अभय गाडगीळ, सुरेश पोळेकर, प्रमोद चव्हाण आदी बैठकीस उपस्थित होते. 

हे चालू राहणार 
- किराणा दुकान 
- औषधी दुकान 
- दूध डेअरी 
- फळे, भाजीपाला 

हे बंद राहणार 
- कापड दुकान 
- हार्डवेअर 
- मोबाईल शॉपी 
- स्टेशनरी आणि कटलरी 
- सराफी दुकान 
- इलेक्‍ट्रिक व इलेक्‍ट्रॉनिक्‍स 

जीवनावश्‍यक वस्तूंअभावी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी येथील भुसार बाजार सुरूच ठेवण्यात येणार आहे. यामुळे बंदच्या काळातही किराणा माल, गूळ, भुसार आदी क्षेत्रातील व्यापार सुरळीतपणे सुरू राहणार आहे. 
- पोपटलाल ओस्तवाल,  अध्यक्ष, दी पूना मर्चंट्‌स चेंबर 

या बंदमधून जीवनावश्‍यक वस्तू आणि औषधांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे भाजीपाला, दूध आणि औषधांची दुकाने नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. 
- फत्तेचंद रांका, अध्यक्ष, व्यापारी महासंघ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Ticket: रेल्वे प्रवास महाग होणार! ट्रेन तिकिटांच्या किमती किती वाढणार? आकडेवारीतून माहिती आली समोर

Air India Flight Grounded : 'एअर इंडिया'च्या विमानात फ्यूल कंट्रोल स्विचमध्ये बिघाड!, उड्डाण ऐनवेळी थांबवले

UPI Transaction: अखेर संभ्रम संपला! यूपीआय व्यवहारांवर शुल्क लागणार का? केंद्र सरकारनं स्पष्ट उत्तर दिलं, महत्त्वाची माहिती समोर

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटाप्रकरणी अमोल खुणेला जामीन; धनंजय मुंडेंसोबत बोलणं झालं होतं का?

Latest Marathi News Live Update: पोर्श कार अपघात प्रकरणी तिघांना जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT