Crime
Crime sakal
पुणे

Crime News : तंबाखूची तलप बेतली जीवावर! तंबाखू मागितली म्हणून डोक्यात दगड घालून मित्राचा खून करण्याचा प्रयत्न

रवींद्र पाटे

नारायणगाव - तंबाखू दिली नाही म्हणून शिवीगाळ केल्याने मित्राने मित्राच्याच डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न केला. जखमीला बेशुद्ध अवस्थेत येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले आहे.

या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी आरोपीवर भादवि कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करून (जिवे मारण्याचा प्रयत्न) अटक केली आहे. जुन्नर न्यायालयाने आरोपीला पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे यांनी दिली.

महेश विजय क्षिरसागर (वय-27 वर्षे, रा. वारूळवाडी, ता.जुन्नर) याच्या डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी राजेश देवराम काळे (रा. वारूळवाडी, ता. जुन्नर) याला अटक करण्यात आली आहे.

पंधरा वर्षांपूर्वी महेश क्षिरसागर याच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. तेव्हापासून तो वारुळवाडी येथील सागर रमेश पवार यांच्या घरी राहत आहे. महेश व राजेश हे मित्र आहेत. रोज रात्री ते एकमेकाला भेटत असे. शुक्रवारी रात्री महेश व राजेश याच्या घरी गेला.

रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास महेश व राजेश यांच्यात तंबाखूच्या कारणावरून वाद झाला. तंबाखू न दिल्याने महेश याने राजेशला शिवीगाळ गेली. रोज तंबाखू फुकट खातो याचा राग राजेश याच्या मनात होता. शिवीगाळ केल्याने संतप्त झालेल्या राजेश याने महेश याच्या डोक्यात दगड घातला.

रक्तस्राव होऊन डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने महेश क्षीरसागर बेशुद्ध पडला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेले सागर पवार, लखन रमेश परदेशी, गणेश कांबळे यांनी रुग्णवाहिका बोलावून महेश क्षीरसागर याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. महेश क्षीरसागर अत्यवस्था आहे. पुढील तपास फौजदार जयदेव पाटील करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT