पुणे

खोपीत ‘एक दिवस शेतकऱ्यांसाठी’ उपक्रम

CD

खेड शिवापूर, ता.१७ : खोपी (ता. भोर) येथील नवविकास युवक शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने रविवारी सुट्टीच्या दिवशी एक दिवस शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हा सामाजिक उपक्रम राबविला. यामध्ये पुण्यातील तरुण डॉक्टर, वकील, आयटी अभियंत्यांनी लावणी केली. या उपक्रमात १०० पेक्षा जास्त शहरवासीयांनी चिखलात भात लावणीचा आनंद घेतला.
शिवगंगा खोऱ्यामध्ये सध्या भात लागवड चालू आहे. आता शेतकऱ्यांची तरुण पिढी नोकरी करून शेती करते. त्यामुळे वारंगुळ्यासाठी जाण्यास त्यांना वेळ मिळत नाही. लावणीसाठी मजूरही मिळत नाही. यामुळे नवविकास शेतकरी संघटनेच्या वतीने दरवर्षी शहरवासीयांना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी येण्याचे आवाहन केले जाते. यावर्षी देखील एक दिवस शेतीसाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी या उपक्रमांतर्गत नामांकित कंपनीतील व आयटी अभियंते डॉक्टर, वकील अशा अनेक सहभाग नोंदविला. उपस्थितांनी सकाळी भात रोपांची काढणी केली व दुपारी इंद्रायणी तांदळाचा मसाले भात व जिलेबी याचा आस्वाद घेऊन दुपारनंतर दोरीवर एका रेषेत थांबून भात लागवडीत सहभाग घेतला. हा उपक्रम चार वर्षांपासून सुरू आहे.
दरम्यान, अन्न किती कष्टातून तयार होते. याची जाणीव व्हावी हे दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून होत आहे, असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब पवार यांनी व्यक्त केले.

दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मोबाईल सोडून एक दिवसाचा शेतकरी बनण्याचा मान संघटनेमुळे मिळाला भात लागवड करताना चिखलाचा आनंद घेतला.
- आशिष वाघ, आयटी इंजिनिअर, पुणे

एसीमध्ये बसून शेती व शेतकऱ्यांचे कष्ट कळाले नसते. शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल कोणी करू शकत नाही. याचा अनुभव संघटनेच्या एक दिवस शेतकऱ्यांसाठी या उपक्रमामुळे कळाला.
- डॉ. स्वाती मोहिते भारती हॉस्पिटल

05568

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनीषा मुसळे माने यांचा पोलिसांना नवा अर्ज! डॉ. शिरीष यांच्यासह पत्नी डॉ. उमा, मुलगा डॉ. अश्विन, सून डॉ. शोनाली यांच्या बॅंक खात्याच्या ऑडिटची मागणी

आजचे राशिभविष्य - 18 जुलै 2025

Panchang 18 July 2025: आजच्या दिवशी दुर्गा कवच स्तोत्राचे पठण करावे

अग्रलेख : तेथे पैजाराचे काम!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 जुलै 2025

SCROLL FOR NEXT