निरगुडसर, ता.१० : खडकी (ता.आंबेगाव) येथील पांढरीवस्ती वरील शेतकरी गणेश वाबळे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याची वनविभागाकडून याची तातडीने दखल घेतली व नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात दोन पिंजरे लावण्यात आले आहेत.
मागील तीन दिवसांपूर्वी याच परिसरात मंजाबा महादू बांगर यांच्या सात महिन्याच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर गुरुवारी शेतकरी वाबळे यांच्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. याबाबत घटनास्थळी मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या सहवनपाल सोनल भालेराव, दीपक औटी यांच्या सहवनरक्षक व कर्मचारी यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भोसले यांनी तातडीने पिंजरा लावण्याबाबत सूचना केल्या. त्यानंतर वनविभागाकडून परिसरात दोन पिंजरे लावण्यात आले आहेत.फोटो खाली
02699, 02698