पुणे

मावळात इच्छुकांच्या कचेऱ्या, तिजोऱ्या उघडल्या

CD

विजय सुराणा : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव दाभाडे, ता. २३ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागली आहे. त्यामुळे राजकीय हालचाली आणि मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. प्रामुख्याने तळेगाव दाभाडे, लोणावळा या दोन्ही नगर परिषद, वडगाव नगर पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच ग्रामपंचायतींसाठी इच्छुकांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या अवलंबवल्या जात आहेत.
गेल्या तीन वर्षापासून इच्छुकांनी लाखो रुपये खर्च करून मोर्चेबांधणी केली होती. मात्र, निवडणुका लांबल्याने अनेकांनी संपर्क कार्यालये आणि खर्चही बंद केला होता. आता निवडणुका होण्याची खात्री झाल्याने कचेऱ्या आणि तिजोऱ्याही उघडण्यात आल्या आहेत. विविध कार्यक्रमांचे नियोजनही करण्यात आले आहे.

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याच्या चर्चा आहेत. इच्छुकांनी शहर तसेच ग्रामीण भागातील प्रमुख ठिकाणी भरगच्च जेवणावळींचे आयोजन केले आहे. याद्वारे मतदारांशी थेट संवाद साधत आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शाकाहारी मतदारांसाठी पारंपरिक पदार्थांनी सजलेली थाळी, तसेच मांसाहारी मतदारांसाठीही मेजवान्या आयोजित केल्या जात आहेत.

इच्छुकांनी निवडला बुधवार
शुक्रवारपासून (ता.२५) व्रतवैकल्यांचा महिना श्रावण सुरू होत असल्याने इच्छुकांनी मतदार व मित्र परिवाराला मेजवानी देण्यासाठी मंगळवार व बुधवार हा दिवस निवडला होता. मंगळवारीदेखील अनेक भागांत ‘आखाड’ पार्ट्या झाल्या. तर, तालुक्यातील सर्व शहरांसह ग्रामीण भागातही बुधवारी ‘आखाड’चे नियोजन होते.

देवदर्शन यात्रांचे नियोजन
श्रावणात विविध ठिकाणी देवदर्शनासाठी इच्छुकांनी नोंदणी सुरू केली आहे. तर, महिलांसाठी ‘खेळ रंगला पैठणी’सह व विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. गणेशोत्सव, दहीहंडी जवळ आल्याने प्रत्येक मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बरोबर संपर्क ठेवून मदतीचे आश्वासन देण्यास सुरुवात केली आहे. सणांपूर्वी ‘जनसंपर्क’ बळकट करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.


या बाबींवर इच्छुकांचा भर
- स्वच्छ प्रतिमा, सभ्य वागणूक, जनतेच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न
- पक्षातील वरिष्ठांशी संपर्क साधण्याचे नियोजन
- स्थानिक पातळीवर पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे नियोजन
- आधी केलेली कामे, स्थानिक प्रश्न आणि त्यावरची भूमिका याचे स्पष्टीकरण
- मतदारांना दाखवण्यासाठी मुद्देसूद माहिती तयार करणे सुरू

PNE25V33669

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: विदर्भात आज रेड अलर्ट; मुसळधारेसह अतिवृष्टीही शक्यता, प्रशासन सतर्क, कसे असेल हवामान? जाणून घ्या

Panchang 25 July 2025: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्राचे पठण करावे

आजचे राशिभविष्य - 25 जुलै 2025

सोलापूर शहरात रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत पोलिसांची गस्त! ६ महिन्यांत चोरट्यांनी फोडली सोलापुरातील ५१ घरे; चोरीच्या २७३ घटनांचीही नोंद

अग्रलेख : बिहारी ‘ओळख परेड’

SCROLL FOR NEXT