मतदारयादी पुनरीक्षणाच्या उपक्रमावर वादाचा इतका धुरळा उडाला आहे की, याविषयीच्या शंकांचे निराकरण आता निवडणूक आयोगालाच करावे लागेल.
संसदीय लोकशाही ही पक्षीय स्पर्धेवर आधारलेली असते आणि कोणत्याही स्पर्धेचे यश हे त्याचे पंच, नियामक किती चोख, निःस्पृह आणि निष्पक्षपाती आहेत यावर अवलंबून असते. या निकषांवर निवडणूक आयोगाचे मूल्यमापन केले तर काय दिसते? बिहारमधील मतदारयादी पुनरीक्षणाच्या आयोगाच्या उपक्रमावर इतका वादाचा धुरळा उडाला आहे की, याविषयीच्या शंकांचे निराकरण आता आयोगालाच करावे लागेल.