मुंबई, ता. १३ : दागिने क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ‘हरी कृष्णा ग्रुपचा ब्रँड असलेल्या ‘किसना डायमंड’तर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ‘किसना डायमंड मॅरेथॉन’चे यंदा दहावे वर्ष आहे. त्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली भव्य मॅरेथॉन स्पर्धा २८ डिसेंबर २०२५ला एकाच वेळी देशातील शंभर शहरांमध्ये पार पडणार आहे.
‘हरी कृष्णा ग्रुपचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक घनश्याम ढोलकिया म्हणाले, ‘‘किसना डायमंड मॅरेथॉन स्पर्धा ही केवळ धावण्याची शर्यत नसून, समाजाप्रती असलेली बांधिलकी व्यक्त करण्याची चळवळ आहे. ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’ मोहिमेद्वारे प्रेरित होऊन, या मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. या निमित्ताने यंदा देशातील शंभर शहरांमध्ये स्वच्छता मोहीमदेखील राबवण्यात येणार आहे. या मॅरेथॉनची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेतली जावी आणि हा विक्रम म्हणून ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवला जावा,यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.’’