पुणे, ता. २ : ‘‘जगाच्या इतिहासात अजिंक्य योद्धा बाजीराव पेशव्यांनी अवघ्या ४० चाळीस वर्षांच्या आयुष्यात ४० पेक्षा अधिक युद्धे केली आणि एकही युद्ध ते हरले नाहीत. परंतु, त्यांच्या या महान पराक्रमाकडे जाणून बुजून दुर्लक्षित केले गेले,’’ असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांनी केले.
मार्केट यार्डमधील संदेशनगरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या समर्थ भारत व्याख्यानमालेत लडकत बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘हिंदुस्थानात बाजीराव पेशव्यांची दहशत एवढी होती की, इराणचा बादशहा नादीरशहा याने दिल्ली लुटण्यासाठी दिल्लीवर आक्रमण केले. पण त्याच वेळी बाजीराव पेशवे आपला समाचार घेण्यासाठी दिल्लीला येत आहे, ही बातमी कळताच नादिरशहा हा पळून गेला. खरे तर बाजीराव हे दिल्लीला पोहोचले देखील नाही. आता तरी पेशवाईची बदनामी करू नका.’’
दरम्यान, लडकत यांनी अजिंक्य योद्धा बाजीराव यांच्या विविध शौर्यगाथा तसेच पालखेडच्या लढाईचा संपूर्ण इतिहास उलगडला. ते म्हणाले की, पेशवाई कालखंडामध्येच अटकेपार झेंडे लावले गेले. पानिपतच्या पराभवाचा कलंकदेखील धुवून काढला. स्मार्ट पुणे या संकल्पनेचा पायादेखील याच कालखंडात घातला गेला. पुणे शहर हे त्याकाळी केंद्रस्थानी होते. तरीही या महान व्यक्तींच्या नावाखाली विनाकारण जाती-जातींमध्ये द्वेष पसरविण्याचे काम आजही केले जात आहे. जे पेशवाईची बदनामी करीत आहेत, त्यांना पुन्हा एकदा इतिहासाची आठवण करून देण्याची गरज आहे.
यावेळी पालखेड युद्ध स्मारक समितीचे संस्थापक सदस्य प्रशांत गोऱ्हे, अशोक धोका, निलय संघवी, मंगेश कुलकर्णी, संदीप खोत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन निलय संघवी यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.