Midi Bus Sakal
पुणे

पुणे शहरात दहा रुपयांत करा दिवसभर प्रवास

पुणे शहराच्या मध्यभागात ‘पीएमपी’च्या बसमधून १० रुपयांत दिवसभर कितीही वेळा प्रवासाची सुविधा देणाऱ्या योजनेची शुक्रवारपासून (ता. ९) अंमलबजावणी होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहराच्या मध्यभागात ‘पीएमपी’च्या बसमधून (PMP Bus) १० रुपयांत दिवसभर कितीही वेळा प्रवासाची (Journey) सुविधा देणाऱ्या योजनेची शुक्रवारपासून (ता. ९) अंमलबजावणी होणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या बससेवेचे उदघाटन होईल. (Travel All Day in Pune for Ten Rupees)

या योजनेसाठी ९ मार्ग निश्चित केले असून, ५० मिडी बस त्यासाठी असतील, अशी माहिती महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली.

रासने म्हणाले, ‘‘स्थायी समितीचा अध्यक्ष या नात्याने सन २०२०-२१ चा अर्थसंकल्प मांडताना ही योजना सादर केली होती. तिची मंजुरीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे. डिसेंबरमध्ये ३०० बसेस उपलब्ध करून संपूर्ण शहरात सहा विभागांमध्ये या योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. स्वस्त, गतिमान, आरामदायी, वेळेची बचत करणारा, सुरक्षित प्रवास ही या योजनेची खास वैशिष्ट्ये आहेत. यातून वाहतुकीची कोंडी कमी होईल, पार्किंगची समस्या दूर होऊन, प्रदूषण, आरोग्याच्या तक्रारी कमी होण्यास मदत होईल.’’

महात्मा फुले मंडईत आर्यन पार्किंगमध्ये शुक्रवारी (ता. ९) दुपारी १ वाजता होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर मुरलीधर मोहोळ असतील. खासदार गिरीश बापट यांच्यासह शहरातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ओळखपत्रावर तिकीट

प्रवाशाचे ओळखपत्र पाहून त्याला तिकीट देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रवाशांना आधारकार्ड, पीएमपीचे ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा शासकीय सेवेत असल्याचे ओळखपत्र कंडक्टर बघेल. त्यावरील शेवटचे चार क्रमांक तिकिटावर नमूद करण्यात येईल. त्यामुळे तिकिटाचे हस्तांतरण होणार नाही, अशी पीएमपीची अपेक्षा आहे.

या मार्गांवर धावणार बस...

  • डेक्कन ते पूलगेट, स्वारगेट ते पुणे स्टेशन, स्वारगेट ते शिवाजीनगर, डेक्कन ते पुणे स्टेशन या दरम्यान नऊ मार्गांवर बस धावणार. शहराचा मध्यभाग आणि पेठांमधून ही वाहतूक होईल.

  • गुलाबी रंगाच्या ५० ‘एसी’ मिडी बस धावणार

  • दहा रुपयांच्या तिकिटावर दिवसभरात कितीही वेळा प्रवास करता येणार

  • बसची आसनक्षमता २४ असून, त्या सीएनजीवर धावतील

  • मुख्य रस्त्यांवर दर पाच, तर अंतर्गत रस्त्यांवर दर पंधरा मिनिटाला बस उपलब्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tesla Roadster Video : 'हवेत उडणारी कार'? Elon Musk यांनी स्वप्न प्रत्यक्षात उतरवले; सेकंदात ६०ची स्पीड अन् ग्रॅव्हिटीची ऐशीतैशी...

Sunlight at Night: आता रात्रीही मिळणार सूर्यप्रकाश! अमेरिकेची कंपनी भारताच्या मदतीने अंतराळात पाठवणार ‘स्पेस मिरर’... कसं करणार काम?

Navi Mumbai: १० टक्के पाणीकपात हटणार, नवी मुंबईत २४ तास पाणीपुरवठा मिळणार; गणेश नाईकांची मोठी घोषणा

Marathi News Live Updates: निळवंडे धरणातून प्रवरा नदीत पाणी सोडले, उत्तर अहिल्यानगरमधील नागरिकांना मोठा दिलासा; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची आशा

Water Conservation: दुष्काळी धाराशिवला ‘एआय’चे वरदान! उसासाठी पाण्याचा भरमसाठ उपसा टळला; ७७० शेतकऱ्यांच्या प्रयोगाने बदलले चित्र

SCROLL FOR NEXT