Sawai_Gandharva_Bhimsen_Festival 
पुणे

'सवाई' महोत्सव होणार की नाही? वाचा आयोजकांचे काय म्हणणे आहे?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय अभिजात संगीताची परंपरा जपणारा, शास्त्रीय संगीत उत्सवातील मानबिंदू सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा होणार की नाही, याबाबत अजूनही अनिश्‍चितता आहे. कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नसल्याने आयोजकांना यंदा उत्सवासाठी अद्याप नियोजन करता आलेले नाही. मात्र, या महोत्सवाला राज्य सरकारकडून परवानगी मिळाली, तर मात्र आयोजनांबद्दल विचार केला जाणार आहे. 

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात दरवर्षी डिसेंबर महिन्यात या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. देशा-विदेशातील कलाकारांना ऐकण्याची पर्वणी संगीत रसिकांना मिळते. ऑक्‍टोबर महिन्याअखेर या उत्सवाचे नियोजन पूर्ण होते. गायक, वादक कलाकारांची नावे निश्‍चित होतात. यंदा त्याचे कोणतेही नियोजन अद्याप करण्यात आलेले नाही. त्यामुळे पुण्यात या वर्षी शास्त्रीय संगीताचे सूर घुमणार का, याबद्दल अजूनही अनिश्‍चितता आहे. 

यंदा कोरोनामुळे राज्यभरातील सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला परवानगी मिळेल का, अशी शंका आयोजकांना आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी 'सकाळ'शी बोलताना म्हणाले, ''सांस्कृतिक कार्यक्रमांबाबत अनिश्‍चितता आहे, परवानगी मिळेल का, हाही प्रश्‍न आहे. त्यामुळे अजूनतरी आम्ही या वर्षीच्या महोत्सवाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.'' 

केंद्र सरकारने येत्या पंधरा ऑक्‍टोबरपासून सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पुढील काळात सांस्कृतिक कार्यक्रमांनाही परवानगी मिळेल, असे निदर्शनास आणून दिले असता श्रीनिवास जोशी म्हणाले, ''सांस्कृतिक कार्यक्रमासाठी राज्य सरकारकडून परवानगी दिल्यास 'सवाई'च्या आयोजनाबाबत निश्‍चित विचार केला जाईल.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Majalgaon Telgaon Road Accident : माजलगावजवळ एसटी बस आणि कारची भीषण धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू, तुळजापूरला देवीच्या दर्शनला निघाले पण...

Kolhapur Mangav Murder Case : मंदिरातून परतताना अल्पवयीन मुलगीचा धारदार शस्त्राने खून, कोल्हापुरातील माणगाव धक्कादायक घटना; आरोपीचा अद्यापही शोध नाही

Gokul Election Controversy : गोकुळच्या निवडणुकीत अंधश्रद्धेला खतपाणी? बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक होतो!; के. पी. पाटलांच्या विधानाने खळबळ

राखी सावंतच्या अडचणीत वाढ; १६ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट, अभिनेत्रीमुळे गेलेला एकाचा जीव

Latest Marathi News Live Update : दक्षिण चेन्नईतील अनेक निवासी भागांत मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले

SCROLL FOR NEXT