esakal | बार, हॉटेलचालकांनो, आता नियम मोडू नका नाहीतर...
sakal

बोलून बातमी शोधा

saurabh-rao

हॉटेल आणि बियर बारचालकांनी ग्राहकांच्या 50 टक्‍के क्षमतेचे, स्वच्छता, वेळ आणि सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचे उल्लंघन केल्यास किमान 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. तसेच, दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास परवाना निलंबित करण्यात येईल, असा इशारा विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी दिला आहे.

बार, हॉटेलचालकांनो, आता नियम मोडू नका नाहीतर...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - हॉटेल आणि बियर बारचालकांनी ग्राहकांच्या 50 टक्‍के क्षमतेचे, स्वच्छता, वेळ आणि सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचे उल्लंघन केल्यास किमान 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. तसेच, दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास परवाना निलंबित करण्यात येईल, असा इशारा विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विभागीय आयुक्‍त कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत राव बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते. 

राव म्हणाले, गणेशोत्सवात बरेच नागरिक घराबाहेर पडल्यामुळे त्यांनतर काही दिवसांत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन सावध झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखणे ही सामूहिक जबाबदारी आहे. त्यासाठी कठोर पावले उचलण्यात येत आहेत. आदर्श कार्यपद्धतीचे पालन व्हावे, यासाठी हॉटेल, बार, रेस्टॉरंट असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेण्यात येत आहे. असोसिएशनसोबत राज्य उत्पादन शुल्क अधिकारी आणि पोलिस यांची एकत्रित बैठक घेण्यात येत आहे. 

आजी तुझ्या हातचं जेवायचंय म्हणून केलेला तो फोन ठरला शेवटचा

बियर बार, हॉटेलमध्ये खेळती हवा असणे गरजेचे आहे. तसेच, हॉटेल, बारमधील कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी अनिवार्य आहे. ही तपासणी प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, बार चालकांविरोधात आपत्ती व्यवस्थापन आणि एक्‍साइज ऍक्‍टनुसार कारवाई करण्यात येईल. नागरिकांचे आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे आहे.

त्यासाठी हॉटेल आणि बारमध्ये नियमांचे पालन होते की नाही, हे तपासण्यासाठी फिरती पथके नेमण्यात येणार आहेत. विभागातील पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातही या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले. 

न्यायालयातील कामकाज ऑनलाईनकडून ऑफलाईनकडे

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. जादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांच्या बिलांचे ऑडिट करून बिले कमी करण्यात येत आहेत. 

विभागीय आयुक्‍त राव म्हणाले, 

  • रुग्ण संख्येत घट पण आम्ही गाफील राहणार नाही 
  • मास्क परिधान न करणाऱ्यांकडून चार कोटींचा दंड वसूल 
  • सर्वांच्या प्रयत्नांतून कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्‍य 
  • ऑक्‍सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्‌स पुरेशा प्रमाणात उपलब्ध 


सोलापूर जिल्ह्यात रुग्ण दर सर्वात कमी 
पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा रुग्णदर सर्वांत कमी 12.50 टक्‍के इतका आहे. तर, पुणे, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात 23 ते 25 टक्‍के आहे. सातारा जिल्ह्यात यापूर्वी रुग्णदर 35 टक्‍क्‍यांवर गेला होता. तो सध्या 27 टक्‍के इतका आहे. 

Edited By - Prashant Patil

loading image
go to top