PuneRé Logo
PuneRé Logo Sakal
पुणे

Pune News : मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या ‘लोगो’चे अनावरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहरातील महत्त्वकांशी मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या ‘पुणेरी’ या (PuneRé) या लोगोचे व ‘पुणेरी काका’ या ‘मॅसकॉट’चे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण झाले.

पुणे - शहरातील महत्त्वकांशी मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या ‘पुणेरी’ या (PuneRé) या लोगोचे व ‘पुणेरी काका’ या ‘मॅसकॉट’चे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण झाले. या प्रकल्पाच्या अनुषंगाने घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांची माहिती देण्यासाठी www.punere.in हे संकेतस्थळ तयार करण्याचे आले आहे, त्याचेही लोकार्पण आज करण्यात आले

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याची मुळा-मुठा नदीसोबत नागरिकांचे एक प्रकारे नाते जोडले गेले आहे. त्यामुळे या दोन्ही नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महापालिकेने हा प्रकल्प हाती घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील काम सुरू झाले आहे. या प्रकल्पामध्ये राबवण्यात येणारे विविध उपक्रम, स्पर्धांची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळासह ‘पुणेरी’ (PuneRé) लोगो, ‘पुणेरी काका’ ‘मॅसकॉट’चे अनावरण करण्यात आले.

यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने आदी यावेळी उपस्थित होते.

नागरिक घेणार प्रतिज्ञा

मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करणे, पूर येण्याचा धोका कमी करणे, नदीच्या बाजूने सार्वजनिक जागा निर्माण करणे, नदीत पाणी टिकवून ठेवणे, नदीकडे जाण्याचा रस्ता सुधारणे, ऐतिहासिक वास्तू, उद्याने आणि अस्तित्वात असलेल्या जागांचे एकीकरण करणे, हे सहा प्रमुख उद्देश आहेत. प्रकल्पाचा नागरिकांना नेमका काय फायदा होणार आहे, याबाबत माहिती व प्रतिज्ञा पुणे महापालिकेतर्फे नागरिकांना देण्यात येणार आहे. पाणी बचत, पर्यावरण संवर्धन या अनुषंगाने ही प्रतिज्ञा आहे.

जनजागृतीसाठी स्पर्धा

मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत पुणे शहरातील नागरिकांना माहिती मिळावी, प्रकल्पाबाबत असणाऱ्या त्यांच्या शंका दूर व्हाव्यात, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. हा प्रकल्प असा असणार याची माहिती नागरिकांना देण्यासाठी ‘एक्सपीरियंस सेंटर’ तयार केले जाणार आहे. रिल्स, फोटोग्राफी, इमोजी, मेमोरीज्, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणारआहे. हे सर्व उपक्रम ‘पुणेरी’च्या या सोशल मीडिया पेजेसच्या माध्यमातून राबवणार आहे. तसेच संकेतस्थळावरही माहिती उपलब्ध असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT