Chandrakant Patil 
पुणे

Chandrakant Patil: "बारामती लोकसभा जिंकायची आहे"; पुणे पालकमंत्रीपद गमावल्यानंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

Sandip Kapde

Chandrakant Patil: उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री स्वतःबद्दल चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पुण्याचे पालकमंत्री पद सोडणे म्हणजे मोठ्या कामासाठी केलेली छोटी तडजोड आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी बारामती लोकसभा जिंकण्याबद्दल वक्तव्य केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. बारामती लोकसभा मतदार संघाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्याला यंदा बारामती लोकसभा जिंकायची आहे. आता जिंकलो नाहीत तर कधीच जिंकणार नाही. त्यासाठी पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे जाणे महत्वाचे आहे. (Latest Pune News)

चंद्रकांत पाटील म्हणाले, "मी पालकमंत्री नाही हे एका मोठ्या उद्दीष्टासाठी केलेली छोटी तडजोड आहे. आपण हे ठरवायला पाहिजे. की जर देशामध्ये तिसऱ्यांना नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायचे असतील. तर एक एक जागा महत्वाची आहे. महाराष्ट्रातील ४८ जागा महत्वाच्या आहेत. त्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने काही विचार केला आहे. त्या विचाराचा आपण सन्मान केला पाहिजे."

"महाविजय २०२४ ची तयारी करताना. बाकीच्या जागा जिंकता येतील पण आपल्याला बारामती विजयी करायची आहे", असे चंद्रकांत पाटील म्हणाले. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. 

बारामती लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. खासदार सुप्रिया सुळे बारामतीचे नेतृत्व करतात. आतापर्यंत भाजपला हा गड जिंकता आला नाही. मात्र आता अजित पवार गट सोबत आल्याने भाजप बारामतीसाठी मोठी शक्ती लावणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apps Ban India : भारताने 'या' 5 OTT प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर लगेच करा डिलीट, नाहीतर होईल कारवाई

Ranji Trophy Final मध्ये मोठा राडा! जम्मू-काश्मीरचा कर्णधार कर्नाटकच्या फिल्डरला भिडला, मग मयंक अगरवालही...

३० हजारांची लाच घेतली अन् फसला, उपसंचालकाकडे ४ कोटींची रोकड, कोट्यवधींचं सोन् आणि अनेक ठिकाणी फ्लॅट; ट्रॉली बॅगेत पैसे

Sensitive Teeth Tips: दात संवेदनशील आहेत? गरम किंवा थंड खाल्ल्यावर झिणझिण्या येतात? हे 3 टिप्स आजच फॉलो करा

Mumbai News: मुंबईतील राणीच्या बागेत गुजरातच्या सिंहाची गर्जना होणार; कधी? महत्त्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT