water supply from Khadakwasla dam 16 percent water storage pune  Sakal
पुणे

खडकवासला प्रकल्पात केवळ १५.९८ टक्के पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : खडकवासला धरणातून सध्या दौंड आणि इंदापूर तालुक्याला पिण्यासाठी पाणी सोडले आहे. कालव्यातून अंदाजे १७ जूनपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर, चारही धरणातील उर्वरित पाणीसाठा हा पुणे शहर परिसराला पिण्यासाठी आरक्षित आहे. तो १५ जुलैपर्यत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत आजअखेर केवळ ४.६६ टीएमसी म्हणजे १५.९८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत २.३८ टीएमसी म्हणजे ८.१७ टक्के पाणीसाठा कमी आहे.

मागील आठवड्यात उन्हाची तीव्रता जास्त असल्यावर धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत होते. मॉन्सूनचे अद्याप आगमन झालेले नाही. त्यामुळे धरणात १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असला पाहिजे. खडकवासला धरणातून यावर्षीचे शेवटचे आवर्तन सुरु आहे. कालव्यातून दौंड तालुक्यासाठी दहा दिवस आणि इंदापूर तालुक्यासाठी दहा दिवस हा पाणी सोडले जाणार आहे. कालव्याच्या शेवटी सर्वात अगोदर पाणी या पाटबंधारे विभागाच्या नियमाने सुरवातीला इंदापूर तालुक्याला पाणी सोडले आहे. इंदापूरला पाणी सोडल्याचे दहा दिवस पूर्ण होत आहेत. आता दौंड तालुक्यासाठी पाणीपुरवठा सुरु आहे. अशा प्रकारे १७ जून दरम्यान हे आवर्तन संपेल. हे सोडलेले पाणी १५ जुलैपर्यंत पुरणारे असते.

संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात २२ व २३ जूनला पुण्यात आहेत. संत तुकाराम महाराज यांची पालखी कालवा जात असलेल्या लोणी काळभोर, उरळी कांचन, यवत, चौफुला, वरवंड पाटसमार्गे जाते. यादरम्यान म्हणजे किमान २७ जूनपर्यंत कालव्यात पाणी आवश्यक असते. याचा फायदा पालखीतील वारकरी व स्थानिक गावांना होतो.

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा (गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत)

धरणाचे नाव- उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीमध्ये), कंसात टक्केवारी

  • खडकवासला- ०.५७ (२९.१५)

  • पानशेत- १.९२ (१०.०५)

  • वरसगाव- २.१६ (१६.८६)

  • टेमघर- निरंक

    एकूण - ४.६६ (१५.९८)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT