Ganesh-Pooja-Set 
पुणे

बाप्पांचे स्वागत करा गणेश पूजा साहित्यासंगे

सकाळवृत्तसेवा

पुणे - विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी आता घरोघर जय्यत तयारी सुरू झाली आहे. कोरोनाच्या संकटात बाप्पांचा उत्सव घरी तेवढ्याच उत्साहात साजरा करण्यासाठी खरेदीला प्रारंभ झाला आहे. ही खरेदी अधिक सुरक्षित, खात्रीशीर व्हावी, यासाठी ‘सेव्हन मंत्रा’च्यावतीने खास ‘गणेश पूजा साहित्य संचा’ची मीडियम बास्केट उपलब्ध करून दिली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे संकट वाढत आहे. अशा वेळी घराबाहेर पडण्यासाठी मर्यादा आल्या आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत लाडक्‍या गणपती बाप्पाच्या स्वागतात कोणताही खंड पडणार नाही, असा निश्‍चय गणेश भक्तांनी केला आहे. गणेशभक्तांचा हा उत्साह पाहून आणि गणरायाच्या आगमनानंतर कोरोनाचे संकट कमी होईल, हा दृढविश्‍वास कायम ठेवत ‘सेव्हन मंत्रा’ ने घरपोच पूजा साहित्य देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ‘ॲग्रोवन-सेव्हन मंत्रा’च्यावतीने घरपोच भाजीपाला आणि फळे पुरविण्यात येतात. त्यासोबत नागरिकांच्या खास मागणीनुसार नामांकित ब्रॅण्डच्या पूजासाहित्याचा संचही तयार करण्यात आला असून, तो घरपोच पोचविला जाणार आहे. या संचाला पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांची मोठी मागणी असून, अनेकांनी आपला संच बुक केला आहे. 

हा संच आता दोन प्रकारात उपलब्ध करण्यात आला आहे. यात मेगा पूजा साहित्य संचात २७ वस्तू देण्यात आल्या आहेत. आता गणेशभक्तांच्या मागणीनुसार मीडियम पूजा साहित्यही उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यात २३ प्रकारचे पूजा साहित्य देण्यात आले आहे. या संचाची किंमत ४९९ एवढी ठेवण्यात आली आहे. त्याचीही अगाऊ नोंदणी सुरु झाली आहे. ही नोंदणी www.sevenmantras.com या वेबसाइटवर करता येईल. 

असा आहे मीडियम पूजा साहित्य संच 
अगरबत्ती, कापूर, हळद, कुंकू, गुलाल, अष्टगंध, मध, अत्तर, गुलाबपाणी, गोमूत्र, हळकुंड, बदाम, खारीक, खोबरे तुकडा, सुपारी, जानवे, फुलवात, समईवात, वस्त्रमाळ, धूप, काडेपेटी, वस्त्र, आरतीसंग्रह पुस्तिका. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT