MLA Siddharth Shirole
MLA Siddharth Shirole Sakal
पुणे

Aundh News : औंधमध्ये एम्स उभारण्याच्या घोषणेचे स्वागत - आमदार सिद्धार्थ शिरोळे

सकाळ वृत्तसेवा

औंध - राज्य सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. या घोषणेचे स्वागत असून, त्यामुळे ससून रूग्णालयावरील भार हलका होईल अशी प्रतिक्रिया आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केली आहे.

ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या धर्तीवर औंध येथे ८०० बेड्सच्या क्षमतेचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन सुमारे दोन वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आमदार शिरोळे यांनी दिले होते. शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन ससून रुग्णालयाला अजून एक सक्षम पर्याय उपलब्ध व्हावा, असा या निवेदनातील मागणीमागे उद्देश होता.

औंध येथे ८४ एकर जागा विनावापर पडून असून त्याजागी हॉस्पिटल व्हावे अशी मागणी केली होती आणि त्याच जागी एम्स हॉस्पिटल होत आहे, ही बाब स्वागतार्ह असल्याचेही आमदार शिरोळे यांनी म्हटले आहे. नागपूर येथील एम्स हॉस्पिटलमध्ये ८३० बेड्सची सुविधा उपलब्ध आहे.

त्याच धर्तीवर पुण्यातही एम्स हॉस्पिटल साकारणार असून ही सुविधा लवकरात लवकर उपलब्ध व्हावी, यासाठी पाठपुरावा करेन, असे आमदार शिरोळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT