corona test 
पुणे

पुण्यात क्वारंटाइन सेंटर बंद, महाविद्यालये सुरू कधी होणार?

ब्रिजमोहन पाटील

पुणे - कोरोना महामारीचे प्रमुख केंद्र बनलेल्या पुण्यात महाविद्यालये, त्यांची वसतिगृहे यामध्ये क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यात आले होते. हे केंद्र बंद करून, त्यांचे सॅनिटायझेशन करून दोन महिने झाले आहेत. त्यामुळे आता महाविद्यालये सुरू करण्यासाठी आता केवळ उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या आदेशाची प्रतिक्षा आहे.

राज्यातील शाळा सुरू झाल्या, पण महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नाहीत. महाविद्यालये सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, पण राज्य शासनाने आप्पती व्यवस्थापन कायद्याचा दाखला देत हा निर्णय कोणत्या आधारावर घेतला असा प्रश्‍न विद्यापीठाकडे उपस्थित केला, त्यामुळे पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये ११जानेवारीपासून सुरू होऊ शकली नाहीत.

दरम्यान, मुंबई, पुण्यासह इतर शहरातील महाविद्यालयांमध्ये क्वारंटाइन सेंटर होते, त्यात किती ठिकाणी केंद्र सुरू आहेत, किती बंद झाली, सॅनिटायझेशन झाले का? याचा आढावा उच्च व तंत्र शिक्षण खात्यातील सचिव, इतर अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून अहवाल सादर करतील. त्यानंतर महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेऊ, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक घेऊन महाविद्यालये सुरू करण्यासाठी तयारी सुरू करा अशा सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने याचा आढावा घेतला.

पुणे शहरात कोरोनाच्या साथीने थैमान घातलेले असताना लागण झालेल्या रुग्णांसाठी क्वारंटाइन सेंटर म्हणून महाविद्यालये, त्यांची वसतिगृहे, शाळा अशा सुमारे १२५ इमारती जिल्हाधिकारी कार्यालयाने ताब्यात घेऊन महापालिकेला दिल्या होत्या. त्यातील सुमारे ३८ ठिकाणी क्वारंटाइन सेंटर म्हणून वापर झाला. कोरोनाची साथ कमी झाल्यानंतर टप्पाटप्प्याने हे सेंटर बंद करण्यात आले आहेत. दिवाळीच्या नंतर शहरातील सर्वच क्वारंटाइन सेंटर बंद करून ते पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्त केले आहेत. मात्र, उदय सामंत यांनी सांगितल्याप्रमाणे पुणे शहरातील महाविद्यालये व वसतिगृहांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उच्च व तंत्र शिक्षण खात्याने माहिती मागितली किंवा नाही हे स्पष्ट होऊ शकले नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुमारे सव्वाशे जागा मिळाल्या होत्या, त्यापैकी ३८ ठिकाणी वापर झाला. शहरातील महाविद्यालये, वसतिगृहांमधील सर्व क्वारंटाइन सेंटर बंद करण्यात आले असून, सॅनिटायझेशन करून ते पुन्हा जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात दिले आहेत.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर शरद कुंटे म्हणाले, ‘‘आमच्या संस्थेच्या शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालयांमधील क्वारंटाइन सेंटर होते, ते बंद झाले आहेत. आमची तयारी पूर्ण झाल्याने शासनाने निर्णय घेतल्यास व पालकांनी तयारी दाखविल्यास महाविद्यालये सुरू होऊ शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT