पुणे

कऱ्हाड सुर्लीग्रामलेखअकराफायनल

CD

महिला स्वावलंबनाकडे

ग्रामीण भागातील महिलांची भूमिका पूर्वी प्रामुख्याने घर, कुटुंब आणि शेतीपुरती मर्यादित मानली जात होती. मात्र, बदलत्या काळानुसार शिक्षण, सामाजिक जागृती आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून महिलांच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडत आहे. कऱ्हाड तालुक्यातील सुर्ली गाव हे याचे उत्तम उदाहरण ठरले आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांत गावातील महिलांनी पारंपरिक चौकटी मोडून स्वावलंबन, नेतृत्व आणि सामाजिक सहभागाच्या दिशेने उल्लेखनीय वाटचाल केली आहे. आज सुर्लीतील महिला केवळ कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या गृहिणी राहिलेल्या नसून गावाच्या विकास प्रक्रियेतील महत्त्वाच्या निर्णयकर्त्या बनल्या आहेत.
गावातील महिला सक्षमीकरणाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्यांचा वाढलेला राजकीय आणि सामाजिक सहभाग. पूर्वी ग्रामसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग अत्यल्प होता. मात्र, आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसते. गावातील महिलांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये नेतृत्वाची संधी मिळाली आहे. सध्या हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्या वहिनी आणि उद्योजक सतीश वेताळ यांच्या पत्नी अनिता वेताळ या कऱ्हाड पंचायत समितीच्या उपसभापती म्हणून कार्यरत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढल्यामुळे गावाच्या विकास प्रक्रियेत महिलांचा आवाज अधिक प्रभावीपणे पोहोचू लागला आहे. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि विविध समित्यांमध्ये काम करताना महिलांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. ग्रामसभांत महिलांचा सहभाग वाढला असून, त्या गावातील पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, स्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित प्रश्न ठामपणे मांडत आहेत. त्याचबरोबर समस्यांच्या निराकरणासाठीही पुढाकार घेत आहेत. त्यामुळे गावाच्या विकासामध्ये महिलांचे योगदान अधिक ठळकपणे दिसून येत आहे. महिला सक्षमीकरणामध्ये बचत गटांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. उमेद अभियानांतर्गत स्थापन झालेल्या बचत गटांमुळे गावातील अनेक महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग सापडला आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन विविध लघुउद्योग आणि व्यवसाय सुरू केले आहेत. गावातील अनेक महिलांनी किराणा दुकाने, टेलरिंग व्यवसाय, ब्युटी पार्लर, तसेच इतर स्वयंरोजगार यशस्वीपणे उभे केले आहेत. या उद्योगांमुळे महिलांना स्वतःचे उत्पन्न मिळू लागले असून, त्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.
आर्थिक स्वावलंबनामुळे महिलांचा आत्मविश्वासही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पूर्वी कुटुंबातील आर्थिक निर्णयांमध्ये महिलांचा सहभाग मर्यादित असे. मात्र, आज अनेक महिला स्वतःच्या व्यवसायाचे नियोजन करतात. आर्थिक व्यवहार हाताळतात आणि कुटुंबाच्या उत्पन्नात महत्त्वाचे योगदान देतात. त्यामुळे त्यांच्या मताला घरामध्ये आणि समाजामध्ये अधिक महत्त्व मिळू लागले आहे. महिलांच्या या प्रगतीचा सकारात्मक परिणाम संपूर्ण गावावर झाला आहे. महिला शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक प्रश्नांबाबत अधिक जागरूक झाल्या आहेत. बचत गटांच्या माध्यमातून परस्पर सहकार्याची भावना वाढली असून, महिलांमध्ये संघटनशक्ती निर्माण झाली आहे. विविध प्रशिक्षण कार्यक्रम, शासकीय योजना आणि सामूहिक उपक्रमांमुळे त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित होत आहेत.
गावातील महिला सक्षमीकरणाचा प्रवास हा केवळ वैयक्तिक प्रगतीचा विषय नाही, तर गावाच्या सर्वांगीण विकासाचा आधार बनला आहे. घर सांभाळतानाच सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिला आज गावाच्या प्रगतीच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे, की संधी आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागातील महिला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात.

बचत गटातून सक्षमीकरण
-------------
सध्या गावातील महिला फक्त घरकाम करणाऱ्या किंवा शेतीपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. त्या गावाच्या विकासाचे नियोजन करणाऱ्या, समस्या सोडविणाऱ्या, उद्योग उभारणाऱ्या आणि नेतृत्व करणाऱ्या सक्षम व्यक्ती म्हणून पुढे आल्या आहेत. बचत गट हा त्यांच्या सक्षमीकरणाचा कणा ठरला असून, त्यातून आर्थिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळाली आहे. त्यामुळे गावातील महिला सक्षमीकरणाची ही वाटचाल ग्रामीण विकासासाठी प्रेरणादायी ठरत असून, गावाच्या उज्ज्वल भवितव्याची नवी दिशा ठरली आहे.

PNE26W40514
कार्यक्रमासाठी एकत्र आलेल्या सुर्लीतील महिला.
.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संयम राखला! जंतर-मंतरवर लाठीचार्जबाबत दिल्ली पोलिसांनी सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर; म्हणाले, आंदोलनाला परवानगीच दिली नव्हती

Video : अजिंक्य रहाणेचा अभिनय पाहिलात का? दीर्घ श्वास अन् रवी शास्त्रींची हुबेहूब नक्कल; कैफ, जडेजा यांना हसू आवरेना

Marathi News Updates : 'देवेंद्र फडणवीस लवकरच केंद्राच्या राजकारणात प्रवेश करतील'

Numerology: क्षणात राग, क्षणात प्रेम! 'या' मूलांकांच्या मुलींचे 'मूड स्विंग्स' सांभाळणे असते कठीण! जन्मतारखेवरून ओळखा स्वभाव!

Dr. Narendra Dabhokar Case : डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : हायकोर्टाकडून सचिन अंदुरेच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती, जामीनही मंजूर

SCROLL FOR NEXT