Rajnandini-and-Bhagyashri 
पुणे

त्या दोघींनी जपली वर्दीतील माणुसकी

सकाळवृत्तसेवा

पुणे - बुधवारी सायंकाळी सहाची वेळ. स्वारगेट बसथांब्यावर थांबलेले एक आजोबा बसमध्ये चढताना तोल जाऊन खाली पडले. त्यांच्या डोक्‍याला दुखापत होऊन रक्त वाहू लागले. त्या वेळी ड्युटी संपवून घरी निघालेल्या राजनंदिनी साळवे व भाग्यश्री वाघमारे या दोन तरुण महिला पोलिस कर्मचारी पुढे आल्या, त्यांनी आजोबांना दवाखान्यात नेले, औषधोपचार करून त्यांच्या घरी पोचवून खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडविले!

साळवे व वाघमारे या दोघीही २०१७ मध्ये पोलिस खात्यात भरती झाल्या. गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या पोलिस आयुक्तालयातील ‘क्रिमिनल इंटेन्सिव्ह सर्व्हायलन्स प्रोजेक्‍ट’च्या (क्रिस्प) सीसीटीव्ही विभागात त्या कार्यरत आहेत. बुधवारी सायंकाळी स्वारगेटला त्या बसची वाट पाहात असताना शेजारीच थांबलेले आजोबा अचानक खाली कोसळले. त्यांना मदत करण्यासाठी कोणीही पुढे येईना. शेवटी साळवे व  वाघमारे यांनीच आजोबांना जवळच असलेल्या डॉ. नितीन बोरा यांच्या रुग्णालयात नेले.  तेथून आजोबांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी निघाल्या. आजोबांच्या तोंडून निघालेल्या ‘पद्मा’ या एका शब्दावरून दोघींनी त्यांना स्वखर्चाने रिक्षातून पद्मावतीला नेले.

पद्मावतीदेवी मंदिराजवळ शोध घेतल्यानंतर त्यांचे कुटुंबीय भेटले. त्यांच्याकडे आजोबांना सोपविल्यावर रात्री साडेअकरा वाजता दोघी त्यांच्या घरी पोचल्या. या घटनेनंतर डॉ. बोरा यांनी पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांना पत्र पाठवून साळवे व वाघमारे यांच्या मदतीबाबत माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT