Dr Baba Adhav Sakal
पुणे

...पण आजच्या महिला या उपभोगू शकतात का? डॉ. बाबा आढाव यांचा सवाल

महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी त्यांचे हक्क आणि अधिकारांबाबत आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जगभरात दरवर्षी आठ मार्चला जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करत असलो तरी, आजच्या महिला या उपभोगू शकतात का? आणि सर्व महिलांना त्यांचे अधिकार आणि हक्कांबाबत जाणीव आहे का, असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी मंगळवारी (ता.८) समता भूमीत बोलताना केला. या महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी त्यांचे हक्क आणि अधिकारांबाबत आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि सत्यशोधक फातिमाबी शेख महिला मंचच्यावतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या विविध पाच विषयांवरील पथनाट्याचे झोपडपट्यांमध्ये सादरीकरण करण्यात आले. या पथनाट्याचे उद्घाटन डॉ. आढाव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी, कार्यवाह प्रा. जमीर शेख, सहकार्यवाह तमन्ना इनामदार, दिलावर शेख, अल्तापहुसेन नवाब, पथनाट्य सादरीकरण समन्वयक आणि आझम कॅम्पस शिक्षण संस्थेतील प्रा. यास्मीन अत्तार, बुशरा शेख आदी उपस्थित होते.

डॉ. आढाव म्हणाले, ‘‘अमेरिकेतील कामगार महिलांच्या अधिकारासाठी सुरु झालेल्या चळवळीच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या संकल्पनेचा उदय झालेला आहे. परंतु ज्या संकल्पनेतून या दिनाची सुरवात झाली, त्या दिनाचा उद्देश खरोखरच सफल होतो आहे का, हे तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. भारतात आणि महाराष्ट्रात आजही महिलांना केवळ कागदोपत्री अधिकार मिळाल्याचे चित्र दिसते आहे. हे अधिकार महिला खरंच उपभोगू शकतात का, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.’’

आझम कॅम्पस शिक्षण संस्थेतील ५० विद्यार्थींनीनी विविध विषयांवरील पाच पथनाट्य तयार करून त्यांचे सादरीकरण केले. प्रत्येक पथनाट्यात प्रत्येकी दहा विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. ही पथनाट्य महिलांचे अधिकार, महिला सबलीकरण, बालकामगार, सामाजिक स्वास्थ आणि महिला आरोग्य या पाच विषयांवर सादर करण्यात आली. डॉ. आढाव यांनी या विद्यार्थीनींशी प्रश्‍नोत्तरे स्वरूपात संवाद साधला. अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT