महिला दिन : महिलांनी सांभाळली 'उद्यान एक्‍सप्रेस'ची धुरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला दिन

महिला दिन : महिलांनी सांभाळली 'उद्यान एक्‍सप्रेस'ची धुरा

सोलापूर : जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी सोलापूर स्थानकावरुन गाडी क्रमांक 01302 बेंगळुरु-मुंबई उद्यान एक्‍सप्रेसची धुरा सांभाळली. सोलापूर विभागतील महिला लोको पायलट अनिता राज, सहायक लोको पायलट भावना कोष्टा, गार्ड वैशाली भोसले, स्टेशन मास्तर सुहासिनी शिंदे तसेच तिकीट तपासणीस, हेल्पर, टेक्‍निशियन, स्टाफ, टॅकमॅन, आणि सुरक्षा रक्षकासहीत महिला कर्मचारी कार्यरत होते. विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता आणि महिला कल्याण संगठन अध्यक्षा प्रतिभा गुप्ता यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर उद्यान एक्‍सप्रेस रवाना करण्यात आली.

यावेळी विभागीय कार्यालयात ऑनलाईन पध्दतीने कार्यक्रम करण्यात आला. यावेळी पोलिस उपायुक्‍त डॉ. दिपाली धाटे आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सोलापूर विभागीय कार्यालय येथे विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देवून गौरिवण्यात आले. तर महिला कर्मचाऱ्यांनी रेल्वेची सेवा बजावताना आलेले विविध थरारक अनुभव उपस्थितांना सांगितले.

हेही वाचा: TET Exam Fraud: नाशिकमधून पावणेतीन हजार परीक्षार्थींना केले पात्र

यावेळी अतिरिक्‍त विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेद्रसिंह परिहार, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी जी. पी. भगत, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता एस. एस. साळवे, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक ए. एल. रणयेवले, विभागीय कार्मिक अधिकारी रमेश अयर, वरिष्ठ विभागीय विद्युत इंजिनिअर अनुभव वार्ष्णेय, विभागीय सहायक यांत्रिक अभियंता रुपेश जाधव, शाखा अधिकारी, मान्यता प्राप्त युनियनचे व असोसिएशनचे पदाधिकारी, लाभ निधीचे सदस्य, कल्याण संगठनच्या कार्यकारी सदस्या व महिला कर्मचारी आदी उपस्थित होते.

Web Title: Solapur Womens Day Udyan Express Service By Women

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top