Young man stabbed minor girl on neck with blade 
पुणे

अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर तरुणीने केले ब्लेडने वार

सुदैवाने ही तरूणी बचावली; हल्ला करणाऱ्या तरूणास अटक

सावता नवले

कुरकुंभ - दौंड तालुक्यातील मळद गावच्या हद्दीत मंगळवारी (ता. 5) सकाळी साडेअकराच्या सुमारास पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या ऊसाच्या शेतामध्ये एका तरूणाने अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार केल्याने तरूणी गंभीर जखमी झाली. सुदैवाने ही तरूणी बचावली आहे. हल्ला केलेल्या तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिरंगुट मुळशी पुणे येथील औद्योगिक वसाहतीतील कुकर हँडल कंपनीतील कामगार राहुल श्रीशैल निरजे (वय 27, मूळ गाव रा. पंचवर्णवाडी खटाव, ता. मिरज, जि. सांगली) याने ससाणेनगर हडपसर येथील एका खाजगी शाळेत बारावीत शिकणाऱ्या सतरा वर्षीय तरूणीला दुचाकीवरून एमएच. 10, डीएस 2710 ) पुणे सोलापूर महामार्गावरून मळद येथे घेऊन गेला.

या तरूणाने तरूणीला महामार्गालगतच्या ऊसाच्या शेतात नेहून तिच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार केले. चेहरा व गळ्यावर वार झाल्याने तरूणी रक्तबंबाळ झाली होती. या जखमी तरूणीला उपचारासाठी दौंड येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी तरूणी सध्या ससाणेनगर हडपसर परिसरात राहतं असून मूळ गाव सोलापूर जिल्ह्य़ातील आहे. सदरची घटना काही तरूण व ग्रामस्थांनी लांब अंतरावरून पाहिल्यानंतर त्यांनी हल्ला केलेल्या राहुल निरजे या तरूणाला पाठलाग करून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live: अजिंक्य रहाणेची आक्रमक खेळी; मुंबईच्या मदतीला 'लॉर्ड' शार्दूल धावला, तरीही KKR ने उभे केले आव्हानात्मक लक्ष्य

पाचवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द; महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी राजकारणावर बंदी, शिक्षण क्षेत्रात मोठे बदल, कुणी घेतला निर्णय?

लग्न आटोपून परतताना स्कॉर्पिओच्या अपघातात ५ जणांचा मृत्यू, ६ गंभीर; गाडीत १६ जण असल्याची माहिती

Amravati : प्रेमी युगुल जंगलात फिरायला गेलं, प्रियकराला बांधून १८ वर्षीय प्रेयसीवर सामूहिक अत्याचार, ५ जणांना अटक

वर्ध्यात पहिल्यांदाच हिमालयीन गिधाड, बोर व्याघ्र प्रकल्पात नोंद; अभ्यासकांमध्ये आनंद

SCROLL FOR NEXT