Punjab Election Result 2022 
Punjab Assembly Election 2022

केजरीवाल पैज जिंकले; ४९ दिवस आधीच लिहून दिलं होतं

सकाळ डिजिटल टीम

विधानसभा निवडणुकीच्या निकालात पंजाबमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचं दिसून येत आहे.

नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीच्या निकालात पंजाबमध्ये (Punjab) मोठी उलथापालथ झाल्याचं दिसून येत आहे. यामध्ये केजरीवालांच्या (Arvind Kejariwal) आम आदमी पक्षाने (AAP) आतापर्यंत जवळपास ९१ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर सध्या सत्तेत असलेल्या काँग्रेसला फक्त १७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला (BJP) केवळ दोन जागांवरच आघाडी मिळाली आहे. काँग्रेसला (Congress) सर्वात मोठा धक्का म्हणजे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे दोन्ही मतदारसंघात पिछाडीवर आहेत. चन्नी चमकौर साहिबमध्ये २३ हजार ५४७ मते मिळाली आहेत. त्याठिकाणी आपचे चरणजीत सिंग हे आघाडीवर आहेत. तर भदौर मतदारसंघात चन्नी यांना जवळपास ८ हजार मते मिळाली असून इथेही विरोधात असलेल्या आपच्या उमेदवाराने आघाडी घेतली आहे. यामुळे दोन्ही ठिकाणी चन्नी हे पराभवाच्या छायेत असून हा पराभव आपच्या उमेदवाराकडूनच होण्याची चिन्हे आहेत. (Punjab Assembly Election Result 2022)

एका बाजुला काँग्रेसला धक्का बसला असताना पंजाबमध्ये आपने मोठी मुसंडी मारली आहे. आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांनी विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या काँग्रेस उमेदवारापेक्षा मान यांना जवळपास ३० हजार अधिक मतांची आघाडी आहे. अशा परिस्थिती पंजाबमध्ये आपचे सरकार येणार हे निश्चित झालं आहे. विशेष म्हणजे याबाबत एक महिन्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात लेखी दिलं होतं. तसंच ट्विटरवरही याबद्दल त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं.

चन्नी यांना काँग्रेसने दोन मतदारसंघात उभा करण्याचा निर्णय हा आपण वर्तवलेल्या अंदाजानंतर घेतला असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं होतं. काँग्रेसनं चन्नी यांना दोन ठिकाणांहून उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर केजरीवाल यांनी ट्विटरवर म्हटलं होतं की, सर्वेनुसार चमकौर साहिबमधून चन्नी निवडणूक जिंकणार नाहीत. काँग्रेसने त्यांना दोन जागावर उमेदवारी घोषित केली आहे. म्हणजेच सर्व्हे खरा होता, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. केजरीवाल यांनी २१ जानेवारी रोजी ट्विट करताना म्हटलं होतं की, मी सकाळीच बोललो, चन्नीजी चमकौर साहिबमधून पराभूत होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT