Amul Company Sakal
Personal Finance

Amul Company: अमूल केवळ दुध दहीचं नाही तर देतय कमाईची संधी, दरमहा देणार 5 लाख रुपये! असा मिळेल फायदा

जर तुम्हीही पैसे कमवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

राहुल शेळके

Earn Money From Business: जर तुम्हीही पैसे कमवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता अमूल तुम्हाला पैसे कमावण्याची संधी देत ​​आहे. AMUL सोबत तुम्ही 5 ते 10 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता.

दुग्धजन्य पदार्थ बनवणाकरी कंपनी अमूल तुम्हाला बंपर कमाई करण्याची संधी देत ​​आहे. तुम्ही 2 लाख ते 6 लाख रुपये खर्च करून तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. हे पैसे तुम्ही कसे कमवू शकता ते जाणून घेऊयात.

किती पैसे गुंतवावे लागतील?

तुम्ही हा व्यवसाय 2 प्रकारे सुरू करू शकता. तुम्ही अमूलचे आउटलेट घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 2 लाखांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. दुसरीकडे, जर तुम्ही फ्रँचायझी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सुमारे 5 लाखांची गुंतवणूक करावी लागेल.

याआधी तुम्हाला सुरुवातीला काही रक्कम डिपॉझीट म्हणून द्यावी लागेल. सुमारे 25000 ते 50,000 रुपये डिपॉझीट म्हणून खर्च करावे लागतील.

कमाई कशी होईल?

अमूलच्या उत्पादनांवर कमिशन मिळते. उदाहरणार्थ, दुधाच्या पॅकेटवर 2.5 टक्के कमिशन, दुग्धजन्य पदार्थांवर 10 टक्के, आईस्क्रीमवर 20 टक्के कमिशन मिळते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या उत्पादनांवर वेगवेगळे कमिशन दर आहे. तुम्हाला आइस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर 50% कमिशन मिळते.

किती जागा लागेल?

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे सुमारे 150 चौरस फूट जागा असावी. अमूल आउटलेट व्यतिरिक्त, जर तुम्ही आइस्क्रीम पार्लरची फ्रँचायझी घेतली तर तुमच्याकडे सुमारे 300 चौरस फूट जागा असावी.

तुम्ही कुठून अर्ज करू शकता?

तुम्ही फ्रँचायझी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अधिकृत मेल retail@amul.coop वर जावे लागेल. येथे तुम्हाला http://amul.com/m/amul scooping parlours या लिंकवर क्लिक करावे लागेल. या लिंकद्वारे तुम्ही सर्व माहिती मिळवू शकता.

5 ते 10 लाखांची कमाई होईल?

अमूल फ्रँचायझीने दिलेल्या माहितीनुसार, फ्रँचायझीच्या माध्यमातून दर महिन्याला सुमारे 5 ते 10 लाख रुपयांची विक्री होऊ शकते. यामध्ये दुधाच्या पाकिटावर 2.5 टक्के, दुग्धजन्य पदार्थांवर 10 टक्के आणि आईस्क्रीमवर 20 टक्के कमिशन मिळते.

नुकसान होण्याची शक्यता नाही:

अमूलसोबत व्यवसाय करणे खूप सोपे आहे. खरे तर यामागे दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे अमूलचा ग्राहकवर्ग आणि दुसरे म्हणजे शहरातील कोणत्याही ठिकाणी व्यवसाय उभा करु शकतो. अमूलचा प्रत्येक शहरात चांगला ग्राहकवर्ग आहे.

प्रत्येक शहरातील लोक त्यांची उत्पादने ओळखतात. मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरांमध्येही ते पोहोचले आहे. म्हणूनच अमूलची फ्रँचायझी घेतल्यास तोटा होण्याची शक्यता नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad: शिवभक्तांसाठी आनंदवार्ता! ३५० नाही तर ५० रुपयांत रोपवेने रायगडावर जाता येणार, महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय; नवा प्लॅन काय?

Theatre Collaboration : सहयोग, संवाद आणि विश्वासातून घडणाऱ्या नाटककलेचा सर्जनशील प्रवास

Ketan Agrawal Murder Case: केतन लोहगडवरून बचावला तर... सियाकडे होता 'प्लॅन बी', तपासात आणखी एक महत्त्वाचा खुलासा!

Indian Cinema History : ‘प्रकल्पवाटा’ पुस्तकातून उलगडते विद्यार्थीकेंद्रित प्रभावी आणि नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती

Rahuri Mystery: राहुरीत अनोखे रहस्य! शब्बीर जिवंत परतल्याने प्रशासन हादरले; कबरीतील मृतदेह कोणाचा, डीएनए अहवालावर नजर..

SCROLL FOR NEXT