Bank Account Sakal
Personal Finance

Bank Account: अनेक बँकांमध्ये खाती उघडून ठेवलीत? बंद होण्याआधी लवकर करा हे काम, नाहीतर खाते होईल बंद

काही लोक एकाच वेळी अनेक बँक खात्यांचा वापर करू शकत नाहीत

राहुल शेळके

Bank Account: सध्या कोणत्याही बँकेत खाते उघडणे खूप सोपे झाले आहे. त्यामुळेच अनेक वेळा आपन गरज नसतानाही बँकेत खातं उघडतो. त्यामुळे प्रत्येकाची अनेक बँकांमध्ये खाती आहेत. बरेच लोक त्यांचे वेगवेगळे बँक खाते देखील नियमितपणे वापरतात.

काही लोक एकाच वेळी अनेक बँक खात्यांचा वापर करू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांची फक्त एक किंवा दोन खातीच सक्रिय असतात.

तुमचेही अनेक बँकांमध्ये खाते असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या कोणत्याही बँक खात्याशी दीर्घकाळ कोणताही व्यवहार करत नाही, तेव्हा तुमचे खाते निष्क्रिय घोषित केले जाते, जे नंतर बँक बंद करू शकते.

बँक खाते का बंद होते?

तुम्ही तुमच्या कोणत्याही बँक खात्यात काही महिन्यांपर्यंत कोणताही व्यवहार केला नाही तर ते निष्क्रिय घोषित केले जाते. जर तुम्ही दोन वर्षे कोणताही व्यवहार केला नाही तर तुमचे खाते बँकेद्वारे आपोआप बंद केले जाते.

तुम्हाला कोणत्याही बँक खात्याची गरज नसल्यास, तुम्ही स्वतः बँकेत अर्ज करून ते बंद करू शकता. जर तुम्हाला त्याचा वापर पुढे चालू ठेवायचा असेल, तर तुम्हाला त्यात नियमित व्यवहार सुरू ठेवावे लागतील.

निष्क्रिय खाते कसे सक्रिय करावे?

बर्‍याच वेळा तुम्ही एक कंपनी सोडून दुसरी कंपनी जॉईन करता तेव्हा तुमची बँकही अनेकदा बदलते. यामुळे तुमचे जुने बँक खाते दीर्घकाळ व्यवहार न केल्यामुळे निष्क्रिय होते.

ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी, तुम्हाला बँकेत जाऊन पुन्हा केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यानंतर तुमचे बँक खाते पुन्हा सक्रिय होईल आणि तुम्ही पुढील व्यवहारांसाठी ते वापरू शकाल.

होम ब्रँच दूर असल्यास काय करावे?

तुमची होम ब्रँच घरापासून लांब असल्यामुळे तुम्ही तुमच्या कोणत्याही बँक खात्यात व्यवहार करू शकत नसाल, तर तुम्ही ते तुमच्या घराजवळील शाखेत ट्रान्सफर करून घेऊ शकता.

यासाठी तुम्हाला तुमच्या आधीच्या होम ब्रँचमध्ये जाऊन खाते हस्तांतरणासाठी अर्ज करावा लागेल. यानंतर तुमचे बँक खाते जवळच्या शाखेत हस्तांतरित केले जाईल आणि तुम्ही सहजपणे व्यवहार सुरू ठेवू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT