Jio Finance: मुकेश अंबानींचा नवा फंडा, रिलायन्स डिजिटलमधून खरेदी केल्यास वस्तूंवर मिळणार कर्ज, खरं कारण वेगळचं

पायलट प्रोजेक्टच्या यशानंतर कंपनी या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत Jio Financial Services लाँच करू शकते.
Jio Financial Services
Jio Financial ServicesSakal
Updated on

Jio Financial Services: लवकरच, ग्राहकांना रिलायन्स डिजिटलकडून टीव्ही-एसी, फ्रीजसह सर्व प्रकारच्या ग्राहक उपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसकडून कर्ज मिळू शकते. यासाठी रिलायन्सने कार्यक्रमाच्या योजनेची आखनी केली आहे.

या पायलट प्रोजेक्टच्या यशानंतर कंपनी या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत Jio Financial Services लाँच करू शकते. कंपनी रिलायन्स डिजिटल वरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चांगले कर्ज पर्याय आणि ऑफर देण्यात येणार आहे, ज्यामुळे रिलायन्स रिटेलचा नफा वाढेल.

रिलायन्स डिजिटलच्या अनेक स्टोअरमध्ये पायलट प्रोजेक्टद्वारे कंपनी विविध वस्तूंच्या खरेदीदारांना इतर वित्तीय संस्था आणि बँकांसह जिओ फायनान्सचा पर्याय देत आहे.

जिओची फायनान्स सेवा सुरू झाल्यानंतर, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँकेसह अनेक वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण होणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंटच्या डिमर्जरला कर्जदार आणि भागधारकांनी सुमारे दोन महिन्यांपूर्वी 4 मे रोजी मंजुरी दिली होती.

हे डिमर्जर शेअर-स्वॅप व्यवस्थेद्वारे केले जाईल. डिमर्जर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंटचे नाव बदलून Jio Financial Services Limited असे केले जाईल.

Jio Financial Services
June 2023 Deadlines: पॅन-आधार लिंक करण्यापासून ते अ‍ॅडव्हान्स टॅक्सपर्यंत, ही 3 महत्त्वाची कामे आजच पूर्ण करा, अन्यथा होईल नुकसान

नवीन कंपनी ऑक्टोबरपर्यंत शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. RIL च्या भागधारकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक शेअरमागे Jio Financial Services चा एक शेअर मिळेल.

2022 मध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजने आपला आर्थिक सेवा व्यवसाय वेगळा करण्यासाठी स्वतंत्र युनिट तयार करण्याची आणि नंतर स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करण्याची घोषणा केली होती.

नवीन कंपनीची योजना काय आहे?

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ग्राहक आणि व्यापारी कर्ज व्यवसाय सुरू करण्याची योजना आखत आहे. जागतिक वित्तीय सेवा कंपनी मॅक्वेरीने गेल्या वर्षी आपल्या अहवालात रिलायन्सच्या वित्तीय सेवा व्यवसायाला पेटीएम आणि इतर कंपन्यांसाठी बाजारातील वाढीच्या दृष्टीने मोठा धोका असल्याचे सांगितले होते.

डिमर्जरनंतर, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही देशातील पाचवी सर्वात मोठी वित्तीय सेवा कंपनी बनू शकते. रिलायन्स इंडस्ट्रीजकडे एनबीएफसी परवाना देखील आहे, ज्यामुळे कंपनीला ग्राहक किंवा व्यापारी कर्जामध्ये फायदा होईल.

रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्स लिमिटेड, रिलायन्स पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड, जिओ पेमेंट्स बँक लिमिटेड, रिलायन्स रिटेल फायनान्स लिमिटेड, जिओ इन्फॉर्मेशन एग्रीगेटर सर्व्हिसेस लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल इन्शुरन्स ब्रोकिंग लिमिटेड यांनी रिलायन्सच्या वित्तीय सेवा व्यवसायात गुंतवणूक केली आहे.

Jio Financial Services
Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.