Dharavi residents to get 350 sq ft flats after redevelopment says Adani group  Sakal
Personal Finance

Adani Group: धारावीत राहणाऱ्या रहिवाशांना अदानी देणार मोठा फ्लॅट; असा आहे प्लॅन

Dharavi Redevelopment: आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील लोकांना पुनर्विकास प्रकल्पानंतर 350 चौरस फुटांचा नवीन फ्लॅट मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारकडून अदानी समूहाला धारावीच्या पुनर्विकासाची जबाबदारी देण्यात आली आहे.

राहुल शेळके

Dharavi Redevelopment: आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील लोकांना पुनर्विकास प्रकल्पानंतर 350 चौरस फुटांचा नवीन फ्लॅट मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारकडून अदानी समूहाला धारावीच्या पुनर्विकासाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सोमवारी अदानी समूहाने एक निवेदन जारी केले की त्यांनी झोपडपट्टीतील रहिवाशांना 350 चौरस फुटांचे नवीन फ्लॅट देऊ केले आहेत. हे फ्लॅट मुंबईतील जुन्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांपेक्षा 17% मोठे असतील.

अदानी समूहाने एका निवेदनात म्हटले आहे की, पूर्वीच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात 269 चौरस फुटांची घरे दिली जात होती, परंतु अदानी समूह धारावीतील रहिवाशांना 350 चौरस फुटांची घरे देणार आहे. या नवीन घरात अटॅच टॉयलेटही असणार आहे.

धारावीच्या पुनर्विकासानंतर येथे कम्युनिटी हॉल, मनोरंजन क्षेत्र, उद्यान, लोकांसाठी रुग्णालयही असणार आहे. लहान मुलांची काळजी घेण्यासाठी डे-केअर सेंटरही बांधले जाणार आहे.

पात्र रहिवासी कोण असतील?

पीटीआयच्या अहवालानुसार, धारावीतील पात्र रहिवाशांसाठी 1 जानेवारी 2000 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच 1 जानेवारी 2000 पासून येथे राहणारे सर्व लोक धारावीचे पात्र रहिवासी मानले जातील आणि त्यांना अदानी समूहाकडून नवीन फ्लॅट दिले जातील.

धारावी पुनर्विकास प्रकल्प महाराष्ट्र सरकार आणि अदानी समूह यांच्यातील संयुक्त उपक्रम म्हणून तयार करण्यात आला आहे, ज्या अंतर्गत अदानी समूह झोपडपट्टीचा विकास करेल. हे कंत्राट अदानी समूहाला नोव्हेंबर 2022 मध्ये देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Ahir: सचिन अहिरांच्या घरात २.६० कोटींची चोरी, ५ वर्षांत टप्प्याटप्प्याने मारला डल्ला; प्रकरण कसे आले उघडकीस?

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ची पातळी वाढणार; नाशिकला गोदेला महापूर, ‘नांदूर मधमेश्वर’मधून मोठा विसर्ग

Latest Marathi News Live Update : जंतरमंतर इंटरनेट बंदीप्रकरणी दिल्ली हायकोर्टाची तातडीची सुनावणी; सरकारच्या निर्णयाला आव्हान

प्राजक्ता माळीनं केलंय किंग खानसोबत काम! एका सीनसाठी घेतलेले 17 टेक; SRKसोबतची जुनी क्लिप व्हायरल

IND vs ZIM T20I Schedule: वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात चमकला... आता भारत-झिम्बाब्वे यांच्यातला पुढील सामना केव्हा?

SCROLL FOR NEXT