Air Traffic Sakal
Personal Finance

Air Traffic: देशांतर्गत हवाई वाहतूकीत मोठी वाढ, विमान क्षेत्रात 'या' एअरलाइन्सचे वर्चस्व कायम

Air Traffic: देशात विमान वाहतूक प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

राहुल शेळके

Air Traffic: देशात विमान वाहतूक प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते ऑगस्ट 2023 या कालावधीत देशांतर्गत प्रवाशांची संख्या 1006.16 लाख होती.

जी मागील वर्षी याच कालावधीत 770.70 लाख होती. त्यामुळे देशातील प्रवाशांच्या संख्येतील वार्षिक वाढ 30.55 टक्के आणि मासिक वाढ 22.81 टक्के झाली आहे.

मे महिन्यात 132.14 लाख प्रवाशांनी विमानाने प्रवास केला. त्यांनी वार्षिक 36.10 टक्के आणि 15.24 टक्के मासिक वाढ नोंदवली.

मे 2023 दरम्यान, नियोजित देशांतर्गत विमान कंपन्यांकडून एकूण 556 प्रवाशांशी संबंधित तक्रारींची नोंद झाली होती. मे 2023 मध्ये प्रति 10,000 प्रवाशांच्या तक्रारींची संख्या 0.42 टक्के होती.

कोणत्या एअरलाइन्सचा सर्वाधिक वाटा?

ऑगस्ट 2023 मध्येही भारतीय विमान बाजारपेठेत इंडिगोचे वर्चस्व दिसून आले. इंडिगोचा बाजाराती वाटा ऑगस्ट 2023 मध्ये सर्वाधिक 63.3 टक्के होता, जो जुलैमध्ये 63.4 टक्के होता.

यानंतर विस्तारा एअरलाइन्सचा बाजारातील वाटा जुलै 2023 मध्ये 8.4 टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये 9.8 टक्क्यांपर्यंत वाढला. स्पाइसजेटचा बाजारातील वाटा ऑगस्टमध्ये वाढून 4.4 टक्के झाला, जो जुलैमध्ये 4.2 टक्के होता.

दुसरीकडे, AirAsia चा बाजारातील वाटा जुलैमधील 9.9 टक्क्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये 9.8 टक्क्यांवर घसरला, एअर इंडियाचा बाजारातील वाटा जुलैमधील 7.5 टक्क्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये 7.1 टक्क्यांवर घसरला आणि Akasa Air चा बाजारातील वाटा ऑगस्टमध्ये 4.2 टक्क्यांवर घसरला.

एअर इंडिया, विस्तारा आणि एअर एशियाचे संचालन करणार्‍या टाटा समूहाचा भारतीय विमान उद्योगात एकूण 26.7 टक्के वाटा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra politics: ‘राष्ट्रवादी’ विलीनीकरणाचा विषय समाप्त; शशिकांत शिंदे यांचे मुंबईतील बैठकीत स्पष्टीकरण, २२ आमदारांच्या भेटीस दुजोरा नाही

Latest Marathi News Live Update : ओतूर येथे बिबट्याचा हल्ला; मोठ्या बहिणीमुळे लहान बहिणीचे वाचले प्राण

Mumbai High Court : पत्नी तुमच्या चाकरीसाठी नाही, जेवण न बनवणे, सफाई न करणे क्रूरता नाही; उच्च न्यायालयाने पतीला फटकारले

GST on Employment Services: रोजगार सेवा उद्योगावरील जीएसटी पाच टक्के?; केंद्र सरकारचा विचार, दिवंगत अजित पवार यांच्या पत्राच्या आधारे हालचाली

Pandharpur Town Project: वारकऱ्यांची खड्डे, चिखलातून होणार मुक्तता; महामार्ग प्राधिकरणाकडून ‘पंढरपूर टाउन’ प्रकल्पाला गती, नेमकं कस असेल रस्त्याचे स्वरूप?

SCROLL FOR NEXT