Adani Group: G-20 परिषद संपली अन् गौतम अदानींना लागला जॅकपॉट, मिळाला मोठा प्रोजेक्ट! काय आहे मास्टर प्लॅन?

Adani Group: गौतम अदानींना मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे.
Adani Group
Adani GroupSakal

Adani Group: भारताच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये G-20 शिखर परिषद पार पडली. या परिषदेत G-20 नेत्यांनी गंभीर समस्यांवर चर्चा केली आणि अनेक मोठे निर्णय घेतले. यामध्ये मिडल ईस्ट युरोप कनेक्टिव्हिटी कॉरिडॉरचा शुभारंभ आणि आफ्रिकन युनियनच्या प्रवेशाला मान्यता देण्यात आली. या परिषदेनंतर देशातील उद्योगपती गौतम अदानींना मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे.

अदानी समूह आता ऊर्जा क्षेत्रात एंन्ट्री करणार आहे. गौतम अदानी यांची कंपनी अदानी एंटरप्रायझेसने जपान, तैवान आणि हवाईमध्ये ग्रीन अमोनिया, ग्रीन हायड्रोजन आणि त्यांच्या मार्केटींगसाठी एक संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे.

या उपक्रमामुळे हरित ऊर्जा क्षेत्रात अदानी समूहाला मोठा फायदा होणार आहे. अदानी समूह संयुक्त उपक्रमाद्वारे ही योजना राबवणार आहे. या संयुक्त उपक्रमात, अदानी एंटरप्रायझेसची उपकंपनी अदानी ग्लोबल पीटीई लिमिटेड आणि सिंगापूरची कंपनी कोवा होल्डिंग्स एशिया पीटीई लिमिटेड एकत्र काम करतील. या संयुक्त उपक्रमात दोन्ही कंपन्यांचा वाटा 50-50 टक्के असेल.

Adani Group
Alphabet Layoffs: गुगलने पुन्हा केली कर्मचारी कपात, इतक्या कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

हरित ऊर्जा क्षेत्रात चीन वेगाने गुंतवणूक करत आहे. द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, चीन या क्षेत्रात आपली क्षमता दुप्पट करणार आहे. चीन 2025 पर्यंत सौर ऊर्जेद्वारे 1200 गिगावॅट ऊर्जेची क्षमता वाढविण्यावर काम करत आहे.

ऊर्जा क्षेत्रातील चीनचे वर्चस्व आणखी वाढवण्यासाठी चीन उर्जा क्षेत्रावर सातत्याने लक्ष केंद्रित करत आहे. चीनची सौर क्षमता या वर्षी 228 गिगावॅटवर पोहोचली आहे. ही क्षमता आता संपूर्ण जगाच्या एकूण क्षमतेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आता भारतही या क्षेत्रावर लक्ष केंद्रित आहे.

Adani Group
Infosysमध्ये ऑफिस बॉयचं काम करणाऱ्या दादासाहेबला अशी सुचली स्टार्टअपची कल्पना.. आज आहे दोन कंपन्यांचा मालक

अदानी समूहाला प्रोजेक्ट मिळाल्याच्या निर्णयानंतर गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. अदानी समूहाचा हा शेअर काल 2,516 रुपयांवर बंद झाला. आज सकाळी कंपनीचा शेअर 2,549 रुपयांवर व्यवहार करत होता. आगामी काळात हा करार अदानी समूहासाठी फायदेशीर ठरू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com