Gold Rate sakal
Personal Finance

Gold Rate : लग्नसराईच्या तोंडावर सोने स्वस्त ; भावात एक हजार रुपयांपर्यंत घट,खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा

लग्नसराई जवळ आली असताना सोन्याच्या भावात गेल्या दहा दिवसांत किंचित बदल झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांत सोने एक हजार रुपयांनी स्वस्त झाल्याने लग्नाच्या निमित्ताने खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लग्नसराई जवळ आली असताना सोन्याच्या भावात गेल्या दहा दिवसांत किंचित बदल झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांत सोने एक हजार रुपयांनी स्वस्त झाल्याने लग्नाच्या निमित्ताने खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. एक जानेवारीला २४ कॅरेट ग्रॅम सोने (प्रति दहा ग्रॅम) ६३ हजार ६८१ रुपये होते तर २२ कॅरेट सोने ५९ हजार २६७ रुपये होते. आता ते अनुक्रमे ६२ हजार ६६० आणि ५८ हजार ३१८ रुपये झाले आहे.

एक ऑगस्टला २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ५९ हजार ९९४ रुपये होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने भाव कमी होत ५७ हजार रुपयांपर्यंत खाली आला होता. मात्र त्यानंतर पुन्हा सोने महाग होत गेले. १८ ऑक्टोबरला २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला ५९ हजार ८०० रुपये झाला होता. तेव्हापासून जानेवारीपर्यंत भाव वाढतच होते. आता ते पुन्हा कमी झाले आहेत.

चांदी ४ हजार रुपयांनी स्वस्त

एक जानेवारीला चांदीचा प्रतिकिलो भाव ७४ हजार ६०० रुपये होता. त्यात तीन हजार ९६० रुपयांची घट होऊन चांदी ७० हजार ६४० रुपये प्रतिकिलो झाली आहे. एक ते १५ जानेवारीदरम्यान चांदी दोन हजार रुपयांनी स्वस्त झाली होती. त्यानंतर सातत्याने चांदीचा भाव कमी होत गेला आहे.

सध्या कोणत्या विशेष कारणामुळे सोन्या-चांदीचे भाव कमी झालेले नाहीत. मार्केटच्या स्थितीनुसार एक ते दोन टक्क्यांनी भाव कमी-जास्त होत असतात. यापुढील काळात लग्नसराई सुरू होणार आहे. त्यामुळे आता खरेदी वाढणार आहे. त्यामुळे किमती वाढण्यासाठी आधीच खरेदी करणे योग्य ठरणार आहे.

- अतुल अष्टेकर, भागीदार, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT