Pune News : केंद्रीय मंत्र्याच्या मुलाचे पुण्यातील हॉटेल सील

एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या नावाने असलेल्या मिळकतीची तीन कोटी ७७ लाख रुपयांची मिळकतकराची थकबाकी असल्याने या ठिकणी असणारे हॉटेल मंगळवारी (ता. २७) पुणे महापालिकेने सील केले
Pune News
Pune News sakal

पुणे : केंद्रीय मंत्र्याच्या पुत्राच्या नावाखालील मालमत्तेच्या तीन कोटी सत्तर सात लाख रुपये मूल्याच्या करबाकीमुळे पुणे महानगरपालिकेने मंगळवारी (दि. २७) त्या हॉटेलला सील ठोकली. या कठोर कारवाईमुळे राजकीय वर्तुळातील व्यक्तींनाही झटका बसल्याचे उघड झाले आहे.हे.

महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून थकबाकी वसुलीवर जोर देण्यात आला आहे. पाच पथकांद्वारे पुणे शहराच्या विविध भागात थकबाकी न भरणाऱ्या व्यावसायिक मिळकती सील केल्या जात आहेत. तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत बँड वाजवून थकबाकी वसूल करण्यावर भर दिला जात आहे.

शिवाजीनगर विभागाच्या हद्दीत डेक्कन कॉर्नर येथे एक मॉल आहे. या मॉलची एकूण पाच कोटी ६० लाख रुपये थकबाकी होती, त्यापैकी एक कोटी ४० लाख रुपये एका मजल्याची थकबाकी संबंधितांनी भरली. त्यानंतर वरच्या दोन मजल्यांची तीन कोटी ७७ कोटी थकबाकी भरावी यासाठी प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. पण संबंधितांकडून त्यास दाद दिली नव्हती. त्यामुळे मंगळवारी महापालिकेच्या पथकाने ही मिळकत सील केली आहे.

Pune News
Pune Crime News : चाकणमध्ये वाढतोय अल्पवयीन गुन्हेगारीचा ट्रेंड ? ; महाळुंगे परिसरात पोलिसांची भीती कमी होतेय का

मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले, ‘‘मंगळवारी दिवसभरात एकूण १६ मिळकती सील करून आठ कोटी रुपये वसूल केले आहेत. त्यापैकी मॉलमधील हॉटेलची तीन कोटी ७७ लाख रुपयांची थकबाकी असल्याने हॉटेल सील केले आहे. पण त्यांनी अद्याप रक्कम भरलेली नाही.’’ दरम्यान, महापालिकेच्या पथकाने हॉटेल सील केले, तो पर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांना ही मिळकत कोणाची आहे याची काहीच माहिती नव्हती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com