Power of Compounding interest mutual fund investment
Power of Compounding interest mutual fund investment Sakal
Personal Finance

पॉवर ऑफ कंपाउंडिंग

सकाळ वृत्तसेवा

- मकरंद विपट

सध्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडे कल वाढला आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसंदर्भात ‘एसआयपी’, ‘एसटीपी’, ‘एसडब्लूपी’ असे अनेक शब्द नेहमीच आपल्या कानावर पडत असतात. त्यात आणखी एक महत्त्वाचा शब्द ऐकायला मिळतो आणि तो म्हणजे ‘पॉवर ऑफ कंपाउंडिंग’.

मात्र, बहुसंख्य गुंतवणूकदारांना ‘पॉवर ऑफ कंपाउंडिंग’ म्हणजे नक्की काय? हे बहुदा माहीतच नाही असे जाणवते.

आपला म्युच्युअल फंड सल्लागार नेहमी गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी एक कॅल्क्युलेशन दाखवित असतो. सोबतच्या तक्त्यावरून ते लक्षात येईल.

गुंतवणूक रक्कम- कालावधी -सरासरी परतावा- एकूण मूल्यांकन

२५०००- २५- १५.००% -६,९०,००,०००

या तक्त्यावरून हे लक्षात येते, की एखाद्या व्यक्तीने दर महिना २५,००० रुपयांची गुंतवणूक २५ वर्षांकरिता केली आणि त्या गुंतवणुकीवर त्याला सरासरी १५ टक्के परतावा मिळाला, तर या २५ वर्षांत त्याची एकूण गुंतवणूक रुपये ७५ लाख होते आणि गुंतवणुकीचे मूल्यांकन ६ कोटी ९० लाख रुपयेहोते.

हे एवढे मोठे मूल्यांकन तेव्हाच होते; जेव्हा सलग २५ वर्षे गुंतवणूक केली जाते. आपल्या कोणत्याही इतर आर्थिक गरजांकरिता ही गुंतवणूक विकली नाही, तर आणि तरच हे मूल्यांकन दिसणे शक्य होते.

‘पॉवर ऑफ कंपाउंडिंग’ समजून घेण्यासाठी आणखी एक उदाहरण बघू. एकदा एक व्यक्ती बैल विकत घेण्याकरिता बैलबाजारात जातो. तिथे त्याला एक अतिशय देखणा बैल दिसतो. त्या बैलाचा सौदा करण्याकरिता तो त्याच्या मालकाकडे जातो.

त्याचा मालक त्या बैलाची किंमत रुपये १ लाख रुपये सांगतो. बैल खरेदी करणारी व्यक्ती त्या बैलाच्या मालकाला पैसे देण्याचे दोन पर्याय देते. पहिला पर्याय म्हणजे पूर्ण एक लाख रुपये एकरकमी देणार आणि दुसरा पर्याय म्हणजे पुढील ३० दिवसांत टप्प्याटप्प्याने पैसे देणार म्हणजे पहिल्या दिवशी ५० पैसे देणार आणि दररोज ती रक्कम आदल्या दिवशीच्या रकमेपेक्षा दुपटीने वाढवणार आणि सर्व रक्कम एकत्र ३०व्या दिवशी देणार. बैलाचा मालक अर्थातच, पहिला पर्याय निवडतो. मात्र, हा पर्याय निवडल्यामुळे त्याने स्वतःचे किती मोठे नुकसान करून घेतले, हे सोबतच्या तक्त्यावरून लक्षात येईल.

दिवस- रक्कम (रुपयांमध्ये)

१- ०.५

१० -२५६

१५ -८,१९२

२० -२,६२,१४४

३०- २६,८४,३५,४५६

या तक्त्यावरून असे दिसते, की बैलाच्या मालकाने फक्त छोट्या अवधीचा फायदा पाहून एक लाख रुपयांत सौदा केला आणि स्वतःचे खूप मोठे नुकसान करून घेतले. बरेच गुंतवणूकदार अशा प्रकारे त्यांची गुंतवणूक थोडासा फायदा झाल्यावर या ना त्या कारणावरून विकतात आणि दीर्घ कालावधीत गुंतवणुकीला येणाऱ्या ‘कंपाउंडिंग इफेक्ट’मुळे होणाऱ्या मोठ्या फायद्याला मुकतात. जशी जशी गुंतवणूक दीर्घकालीन होत जाते, तसे तसे गुंतवणुकीचे मूल्यांकन हे छोट्या कालावधीत पटीत वाढायला सुरुवात होते. तेव्हा आपण केलेली गुंतवणूक दीर्घ कालावधीकरिता ठेवा आणि ती आंशिक किंवा संपूर्ण विकावी लागू नये म्हणून ‘आपत्कालीन निधी’ची तरतूद करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

ब्रेकिंग! ‘आरटीई’ प्रवेशाला मंगळवारपर्यंत मुदतवाढ; शिक्षण संचालकांचे आदेश; आता मुदतवाढ नसल्याचेही स्पष्टीकरण

Nagpur Temp : नागपूरमध्ये नोंद झालेलं 56 डिग्री तापमान होतं चुकीचं! हवामान विभागाला का द्यावं लागलं स्पष्टीकरण?

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

SCROLL FOR NEXT