RBI imposes penalty on Bank of India, Bandhan Bank Sakal
Personal Finance

RBI Action: रिझर्व्ह बँकेने 2 बँकांना दिला झटका; तुमचे खाते आहे का? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

RBI penalty on Banks: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर कारवाई करत आहे. अलीकडे पेटीएम पेमेंट बँकेवर बंदी घातल्यानंतर अनेक बँकांवर कारवाई करण्यात आली असून दंडही ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने दोन बँकांवर कारवाई केली.

राहुल शेळके

Penalty on BoI and Bandhan Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर कारवाई करत आहे. अलीकडे पेटीएम पेमेंट बँकेवर बंदी घातल्यानंतर अनेक बँकांवर कारवाई करण्यात आली असून दंडही ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने दोन बँकांवर कारवाई केली. (RBI imposes penalty on Bank of India, Bandhan Bank)

बँक ऑफ इंडिया आणि बंधन बँकेला ठोठावला दंड

रिझर्व्ह बँकेने बुधवारी सांगितले की, काही नियमांचे पालन न केल्याबद्दल बँक ऑफ इंडियाला 1.4 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यासोबतच काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील बंधन बँकेला 29.55 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

'ठेवीवरील व्याज दर', 'बँकांमधील ग्राहक सेवा', 'कर्जावरील व्याज दर' आणि क्रेडिट माहिती कंपनी नियम, 2006 च्या तरतुदींचे उल्लंघन करण्यासंबंधी RBI निर्देशांचे पालन न केल्याबद्दल बँक ऑफ इंडियाला दंड ठोठावला आहे.

रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की 'NBFCs (रिझर्व्ह बँक) मार्गदर्शक तत्त्वे, 2016' आणि KYC निर्देशांमधील काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेडवर 13.60 लाख रुपये दंड आकारला जाईल.

यापूर्वी एसबीआयला दंड ठोठावण्यात आला होता

याआधी भारतीय रिझर्व्ह बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. बँकेवर नियमांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. यासोबतच सेंट्रल बँकेने कॅनरा बँक आणि सिटी युनियन बँकेलाही दंड ठोठावला होता.

कॅनरा बँकेला 32.30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्याचबरोबर सिटी युनियन बँकेला 66 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.

ग्राहकांवर काय परिणाम होणार?

बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून दंड आकारला जातो. तो दंड फक्त बँकांना भरावा लागतो. यामध्ये खातेदारांना कोणताही दंड भरावा लागत नाही. हा दंड फक्त बँकेलाच भरावा लागतो. त्यामुळे या बँकांवर आरबीआयने लादलेल्या आर्थिक दंडाचा बँक ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

Blinkit-Zeptoवरून ५ किलोपेक्षा जास्त साखर मिळणार नाही! सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना झटका; Online खरेदीवर मर्यादा...

Marathi News Live Updates : 'लाडक्या बहिणींना' नागपूर महानगर पालिकेतर्फे रक्षाबंधनाची भेट

Mumbai Local: पार्किंगची फेररचना, नायगाव-भाईंदरमध्ये ३१ नव्या मार्गिका; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT