Vodafone Idea News  sakal
Personal Finance

Vodafone Idea News : ‘व्होडा-आयडिया’ उभारणार ४५ हजार कोटी

आर्थिक अडचणीत सापडलेली दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाने शेअर आणि कर्ज रोखे आदी पर्यायांच्या माध्यमातून ४५ हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याची योजना आखली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आर्थिक अडचणीत सापडलेली दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाने शेअर आणि कर्ज रोखे आदी पर्यायांच्या माध्यमातून ४५ हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याची योजना आखली आहे.

त्यापैकी शेअर आणि संबंधित पर्यायांद्वारे २० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याच्या प्रस्तावाला कंपनीच्या संचालक मंडळाने आज मान्यता दिली. कंपनीचे प्रवर्तकदेखील यात सहभागी होणार आहेत, असे कंपनीने सांगितले.

व्होडाफोन आयडिया कंपनी अस्तित्वासाठी संघर्ष करत असून, तिच्यावर २.१ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. कंपनीच्या ग्राहकांमध्येही घसरण होत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने २० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी बँकर व अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी व्यवस्थापनाला परवानगी दिली आहे.

कंपनी दोन एप्रिल २०२४ रोजी भागधारकांची बैठक बोलावणार असून, त्यांनी मंजुरी दिल्यानंतर तिमाहीत निधी उभारणी पूर्ण करेल, असेही कंपनीने म्हटले आहे. याशिवाय, कंपनी कर्ज मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. सध्या कंपनीचे बँकाकडून घेतलेले कर्ज ४,५०० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. शेअर आणि कर्ज रोख्यांच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या निधीमुळे कंपनीला फोर-जी कव्हरेज, फाइव्ह-जी नेटवर्क उपलब्ध करणे आणि क्षमता विस्तारासाठी लक्षणीय गुंतवणूक करता येईल. ग्राहकांना चांगला अनुभव देता येईल, असेही कंपनीने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Viral Video : स्वच्छतागृहात शिवरायांचा अन् राणी पद्मावतींचा फोटो; नेटकऱ्यांनी आक्षेप घेताच बदलला फोटो...

Hulikunteshwara Temple : 'देवा, माझी सासू पुढील वर्षीच्या जत्रेपूर्वी मरू दे..'; दानपेटीत आढळलेल्या 100 रुपयांच्या नोटेवरील मजकूराने खळबळ, कोणी लिहिलं असं?

Latest Marathi News Live Update : अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Summer Fruit Shopping Tips: गोड की केमिकल? कलिंगड खरेदी करताना ‘या’ 5 टिप्स नक्की तपासा

अजितदादा महाराष्ट्राला न लाभलेले मुख्यमंत्री, त्यांनी पहिल्यांदा टायमिंग चुकवलं; CM फडणवीसांनी सांगितल्या आठवणी, शेवटची भेट...

SCROLL FOR NEXT