Aarti Industries Shares Jump Over 8 percent On Rs 6,000-Crore Contract  Sakal
Share Market

Aarti Industries: आरती इंडस्ट्रीजच्या शेअर्सचे भाव का वाढत आहेत?

Aarti Industries: आरती इंडस्ट्रीजच्या (Aarti Industries) शेअर्समध्ये नुकतीच 8.6 टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली. सध्या हा शेअर बीएसईवर सुमारे 4.86 टक्क्यांच्या वाढीसह 611.20 रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, इंट्राडेमध्ये तो 633 रुपयांच्या पातळीवर पोहोचला.

राहुल शेळके

Aarti Industries: आरती इंडस्ट्रीजच्या (Aarti Industries) शेअर्समध्ये नुकतीच 8.6 टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली. सध्या हा शेअर बीएसईवर सुमारे 4.86 टक्क्यांच्या वाढीसह 611.20 रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, इंट्राडेमध्ये तो 633 रुपयांच्या पातळीवर पोहोचला.

कंपनीने 6000 कोटीचा लॉन्ग टर्म कॉन्ट्रॅक्ट साइन केला आहे. स्पेशालिटी केमिकलच्या सप्लायसाठी कंपनीने एका मल्टीनॅशनल कंपनीसोबत करार केला आहे. यामुळेच गुंतवणूकदार या शेअरमध्ये जोरदार खरेदी करत आहेत.

हा प्रोजेक्ट आरतीच्या लॉन्ग टर्म ग्रोथ स्ट्रेटेजीचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि गेल्या 4-5 वर्षांमध्ये त्याचे प्रमाण सतत वाढत आहे. आज जगासमोरील प्रचंड आर्थिक आव्हाने असूनही हा करार करण्यात आला आहे, जे डायवर्स रसायनशास्त्रातील कौशल्याचा पुरावा असल्याचे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र व्ही गोगरी म्हणाले.

काँट्रॅक्टमध्ये चार वर्षांच्या कालावधीसाठी केमिकल सप्लाय समाविष्ट असल्याचे आरती इंडस्ट्रीजने एका एक्स्चेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे. गेल्या महिन्यात कंपनीने केलेला हा दुसरा करार आहे. 27 डिसेंबला, कंपनीने 3,000 कोटीपेक्षा जास्त कमाईची क्षमता असलेल्या जागतिक ऍग्रोकेम कंपनीसोबत नऊ वर्षांचा करार केला होता.

आरती इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये गेल्या 6 महिन्यांत 31 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. मात्र, गेल्या वर्षभरात या शेअर्सने केवळ 6 टक्केच परतावा दिला आहे. गेल्या 5 वर्षात त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 80 टक्के नफा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT