Adani Anthem Song
Adani Anthem Song  Sakal
Share Market

Adani Anthem Song : "तुफानोसे तू ना डरता तेरा नाम अदानी ", म्हणत अदानींच्या सपोर्ट मध्ये उतरले रॅपर भिडू

सकाळ डिजिटल टीम

Gautam Adani vs Hindenburg : गौतम अदानी हे भारतातील आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. भारतात त्यांनी गेल्या पाच वर्षांत त्यांच्या समुहाने विमानतळं, सिमेंट, तांबे उद्योग, रिफायनरी, डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन, पेट्रोकेमिकल्स, रस्ते निर्माण आणि सौर उर्जा अशा क्षेत्रांमध्ये भरपूर गुंतवणूक केली आहे.

मात्र अमेरिकन शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या नकारात्मक अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. या अहवालामुळे भारत आणि आशियातील सर्वात मोठे उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहात अनेक अडचणी असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतलेला आहे. असे आरोप करण्यात आले आहेत.

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे आणि जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीतूनही ते बाहेर पडले आहेत.

या सर्व प्रकरणावर आता गौतम अदानी यांच्या समर्थनार्थ रॅप गाणे आले आहे. 'अदानी अँथम - तेरा नाम अदानी है' असे या गाण्याचे नाव आहे. गाण्यात गौतम अदानी यांचा प्रवास दाखवला आहे. गौतम अदानी देशभक्त आहेत असे या गाण्यातून सांगितले आहे. या गाण्यावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे.

Da Banotra Studio ने हे गाणे प्रदर्शित केले आहे. आत्ता पर्यंत तीन लाख लोकांनी हे गाणं पाहिले आहे. हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौ संघात मोठा बदल; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT