Gautam Adani News : NSE चा पेटीएमला मोठा धक्का! अदानींच्या दोन कंपन्यांना NSE कडून...

अदानी समूहाबाबत आणखी एक महत्वाची बातमी समोर येत आहे.
Gautam Adani
Gautam AdaniSakal

Gautam Adani News : अमेरिकन फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अडचणींचा सामना करणाऱ्या गौतम अदानी समूहाच्या 2 कंपन्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE ने निफ्टीच्या काही निर्देशांकांमध्ये अदानी विल्मर आणि अदानी पॉवर या दोन समूह कंपन्यांचा समावेश केला आहे.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या स्टेटमेंटनुसार, अदानी विल्मारला निफ्टी नेक्स्ट 50 आणि निफ्टी 100 इंडेक्समध्ये स्थान मिळाले आहे. तर, अदानी पॉवरला निफ्टी 500, निफ्टी 200, निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी मिडकॅप 150, निफ्टी लार्ज मिडकॅप 250 आणि निफ्टी मिडस्मॉलकॅप 400 निर्देशांकांमध्ये प्रवेश मिळाला आहे.

निर्देशांकातील सर्व बदल 31 मार्चपासून लागू होतील. मात्र, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने आपला निफ्टी 50 निर्देशांक कायम ठेवला.

पेटीएमला झटका :

अदानी विल्मर व्यतिरिक्त, निफ्टी नेक्स्ट 50 निर्देशांकात समाविष्ट होणार्‍या इतर कंपन्या ABB इंडिया, कॅनरा बँक, पेज इंडस्ट्रीज आणि वरुण बेव्हरेजेस आहेत.

Gautam Adani
Gold Silver Price : आनंदाची बातमी! आज सोन्याचा दर पाच आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर; जाणून घ्या दर

त्याच वेळी, बंधन बँक, बायोकॉन, ग्लँड फार्मा, एमफेसिस आणि पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्समधून वगळण्यात येतील.

Gautam Adani
ट्रेडिंग कुठल्याही प्रकारचे असो 'स्टाॅप लाॅस' हवाच

अदानीच्या शेअर्सबाबत 'ही' मागणी करण्यात येत आहे :

हे लक्षात घेण्यासारखे आहे की हिंडेनबर्ग अहवाल समोर आल्यापासून विरोधी पक्ष अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सला निफ्टी 50 मधून वगळण्याची मागणी करत आहेत. हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल आल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com