Multibagger Stock Sakal
Share Market

Multibagger Stock: तीन वर्षात कंपनीने दिला आठपट रिटर्न, आता आठव्यांदा केली डिव्हिडेंडची घोषणा

कंपनीने पुन्हा डिव्हिडेंडची घोषणा केली आहे.

शिल्पा गुजर

Multibagger Stock: सॉफ्टवेअर सर्व्हिसेस आणि प्रॉडक्ट कंपनी केसॉल्व्स इंडियाचे (Ksolves India) शेअर्स सुमारे तीन वर्षांपूर्वी देशांतर्गत बाजारात दाखल झाले. या कंपनीने आतापर्यंत आयपीओ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 802 टक्क्यांनी वाढ केली आहे.

या व्यतिरिक्त, कंपनीने आतापर्यंत सात वेळा 61.25 रुपयांचा डिव्हिडेंड दिला आहे आणि आता कंपनीने पुन्हा डिव्हिडेंडची घोषणा केली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 8 रुपयांचा फायनल डिव्हिडेंड जाहीर केला आहे, ज्याला बोर्डाने मान्यता दिली आहे.

मात्र, त्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) भागधारकांची मंजुरी घेणे बाकी आहे. 24 जून 2023 रोजी बोर्डाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात येईल अशी शक्यता आहे. सध्या केसॉल्व्स इंडियाचे शेअर्स बीएसईवर 2.10 टक्क्यांच्या वाढीसह 901.65 रुपयांवर ट्रेड करत आहे.

केसॉल्व्स इंडियाचे शेअर्स 6 जुलै 2020 रोजी देशांतर्गत बाजारात लिस्ट झाले. हा शेअर आयपीओ गुंतवणूकदारांना 100 रुपयांच्या किंमतीला जारी करण्यात आला होता आणि आता तो 901.65 रुपयांवर आहे, याचा अर्थ तीन वर्षांत आयपीओ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 9 पटीने वाढ झाली आहे.

केसॉल्व्स इंडिया ही कंपनी 2014 मध्ये सुरु झाली. ही कंपनी एंटरप्राइझ सोल्युशन्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, कन्सल्टिंग आणि आयटी सोल्यूशन्समध्ये सर्व्हिसेस देते. त्यांचा व्यवसाय हेल्थकेअर, टेलिकॉम, ई-कॉमर्स, रिअल इस्टेट आणि फायनान्समध्ये पसरलेला आहे.

कंपनीचा व्यवसाय 30 देशांमध्ये सुरु आहे, तर कंपनीची 80 टक्के विक्री उत्तर अमेरिकेत आहे. कंपनीचा जानेवारी-मार्च 2023 मध्ये निव्वळ नफा 6.13 कोटी रुपयांवरून 7.18 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे आणि त्याच तिमाहीत महसूल 20.28 कोटी रुपयांवरून 22.46 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT