Investment Tips in marathi Which 10 shares perform today AUBANK MPHASIS WIPRO 27 March 2024  Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची संधी; 'या' 10 शेअर्सच्या हालचालींवर ठेवा लक्ष

Share Market Investment Tips: भारतीय शेअर बाजारातील सलग 3 दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला. निफ्टी मंगळवारी 22,000 च्या खाली घसरला आहे. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 361.64 अंकांनी अर्थात 0.50 टक्क्यांनी घसरून 72,470.30 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): भारतीय शेअर बाजारातील सलग 3 दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला. निफ्टी मंगळवारी 22,000 च्या खाली घसरला आहे. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 361.64 अंकांनी अर्थात 0.50 टक्क्यांनी घसरून 72,470.30 वर आणि निफ्टी 92.10 अंकांनी म्हणजेच 0.42 टक्क्यांनी घसरून 22,004.70 वर पोहोचला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी मंगळवारी दिवसभर साइडवेज राहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. पण डेली इंडेक्स चार्टवर महत्त्वाच्या मूव्हिंग एव्हरेजवर इंडेक्स बंद झाल्यामुळे शॉर्ट टर्म कल पॉझिटीव्ह दिसत आहे. शॉर्ट टर्म सपोर्ट 21,840 वर खालच्या पातळीवर दिसत आहे. तर 22,240-22,300 वर रझिस्टन्स दिसत आहे.

बँक निफ्टी इंडेक्सने साइडवेज व्यापार करत संथ सुरुवात केल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. निफ्टीसाठी 47000 वर रझिस्टंस दिसत आहे.

हा रझिस्टंस पार केल्यास, बँक निफ्टीमध्ये 48,000 अंकांच्या दिशेने शॉर्ट-कव्हरिंग दिसू शकते. त्याच वेळी, डाउनसाइडवर, 46,500-46,450 च्या झोनमध्ये बँक निफ्टीला सपोर्ट आहे. हा सपोर्ट तुटल्यास, बँक निफ्टी 46,000 पर्यंत घसरू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • ऍबॉट इंडिया (ABBOTINDIA)

  • ए यू बँक (AUBANK)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • विप्रो (WIPRO)

  • डिव्हीस लॅब (DIVISLAB)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT